शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांची पाठ, लेकाने सोडली नाही साथ; ८ वर्षांच्या मुलाने पोस्टमार्टमसाठी नेला आईचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:56 IST

एका आठ वर्षांच्या चिमुरड्याला आपल्या आईचा मृतदेह घेऊन स्वतः जिल्हा मुख्यालयात शवविच्छेदनासाठी जावं लागलं.

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा पोलीस ठाणे हद्दीतील नगला धीरज गावातून मन सुन्न करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठ वर्षांच्या चिमुरड्याला आपल्या आईचा मृतदेह घेऊन स्वतः जिल्हा मुख्यालयात शवविच्छेदनासाठी जावं लागलं. वीरांगना अवंतीबाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान  ४५ वर्षीय नीलम यांचा मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी वडिलांचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी या कुटुंबापासून अंतर राखलं, ज्यामुळे या मुलाकडे कोणताही आधार उरला नव्हता. मालमत्तेच्या लोभापोटी नातेवाईकांनी उपचारासाठी कोणतीही मदत केली नाही. अखेर हतबल होऊन या लहान मुलाने आपल्या आईच्या अंतिम प्रवासाची जबाबदारी एकट्यानेच खांद्यावर घेतली.

या हृदयद्रावक घटनेने समाजाचा क्रूर चेहरा उघड केला आहे. वडिलांच्या निधनानंतर आई गंभीर आजाराशी झुंज देत होती. या लहान मुलाने एकट्यानेच आईला उपचारासाठी फर्रुखाबाद, कानपूर आणि दिल्लीपर्यंत नेलं होतं. गेल्या आठ दिवसांपासून तो मेडिकल कॉलेजमध्ये दिवसरात्र आईची सेवा करत होता. आईच्या निधनानंतर जेव्हा एकही नातेवाईक खांदा देण्यासाठी पुढे आला नाही, तेव्हा समाजासमोर हा छोटा मुलगा एकटाच खंबीरपणे उभा राहिला.

या मुलाने आपल्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे काका आणि इतर नातेवाईकांचा डोळा त्याच्या मालमत्तेवर आहे, मात्र आजारपणात कोणीही एक रुपयाही खर्च केला नाही, असं त्याने सांगितलं. जैथरा पोलीस ठाण्याचे प्रभारी रितेश ठाकूर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने हस्तक्षेप केला आहे. पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की, ते केवळ महिलेचे अंत्यसंस्कारच करणार नाहीत, तर या निराधार मुलाला शक्य ती सर्व मदतही करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Abandoned by Relatives, 8-Year-Old Carries Mother's Body for Autopsy

Web Summary : In Uttar Pradesh, an 8-year-old boy was forced to transport his mother's body alone for a postmortem after she died from illness. Relatives shunned them after the father's death, leaving the child with no support. Police intervened to help with the funeral and provide assistance.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू