शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 19:19 IST

हवाई संघर्ष झाल्यास पाकिस्तानी हवाई दलावर भारतीय हवाई दल भारी पडणार

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमानं दाखल झाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली. पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेता राफेल विमानं हवाई दलाच्या अंबाला तळावर तैनात करण्यात आली आहेत. BVRAAM मीटियर मिसाईलनं सज्ज असलेलं राफेल आशिया खंडातलं सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान मानलं जात आहे.BVRAAM मीटियर मिसाईलनं सुसज्ज असलेल्या राफेल विमानांमुळे पाकिस्तानी हवाई दलाची सर्वच्या सर्व विमानं संकटात सापडली आहेत. गेल्या वर्षी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारतीय हवाई दलाची चकमक झाली. त्यात पाकिस्ताननं अमेरिकेकडून घेतलेल्या एफ-१६ विमानांचा वापर करून AIM-120 AMRAAM (ऍडव्हान्स मीडियम रेंज एअर टू एयर मिसाईल)च्या मदतीनं भारताचं मिग-२१ विमान पाडलं. भारतानंदेखील पाकिस्तानचं एक एफ-१६ विमान जमीनदोस्त केलं. मात्र चकमकीदरम्यान पाकिस्तानी हवाई दल भारताला कोणतीही संधी न देता अतिशय दुरून विमानांना लक्ष्य करत असल्यानं भारतीय हवाई दलाची चिंता वाढली. भारतीय हवाई दलातलं महत्त्वाचं विमान असलेल्या सुखोईवरही निशाणा साधण्यात आला. सुखोईनं AMRAAM पासून बचाव केला. पण सुखोईला पलटवार करता आला नाही. पाकिस्तानच्या एफ-१६ मधील AMRAAM मुळे भारताची चिंता वाढली होती. पाकिस्तानकडे आधी AMRAAM चं सुरुवातीचं मॉडेल AIM-120A/B विकत घेतलं. त्याची रेंज ७५ किमी होती. त्यानंतर पाकिस्ताननं १०० किमी रेंज असणारं AIM-120C-5 क्षेपणास्त्र खरेदी केलं. त्यामुळे पाकिस्तानी विमानं भारतीय विमानांना स्पॉट न करताही त्यांच्यावर हल्ले करू शकत होती. त्यामुळे भारतीय हवाई दलाला आक्रमण करण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता.आता राफेलच्या आगमनामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. राफेलमध्ये BVRAAM (बियॉण्ड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल) मीटियर यंत्रणा आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत संघर्ष झाल्यास एफ-१६ सह सर्वच्या सर्व लढाऊ विमानं संकटात सापडू शकतात. पाकिस्तानी हवाई दलातली जेएफ-१७ विमानं राफेलसाठी अत्यंत सोपी शिकार ठरू शकतात. त्यामुळेच राफेल भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलRafale Dealराफेल डीलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक