शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:54 IST

Indian Railway News: रेल्वे ट्रॅकजवळ चित्रीकरण करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना मोठ्या दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात येईल.

दोन दिवसांपूर्वी ओडिशातील पुरी येथे रेल्वे रुळाजवळ व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ट्रेनच्या धडकेत एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे रेल्वे ट्रॅकजवळ चित्रीकरण करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना मोठ्या दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.

ईस्ट कोस्ट रेल्वेने गुरुवारी अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की,  "रेल्वे ट्रॅक, स्टेशन परिसर आणि चालत्या गाड्यांचे फूटबोर्ड हे जोखीम असलेले 'ऑपरेशनल क्षेत्र' आहेत, ते मनोरंजक व्हिडिओ बनवण्यासाठी नाहीत. या ठिकाणी बेकायदेशीरपणे प्रवेश करणे किंवा धोकादायक स्टंट करणे हे केवळ जीवघेणेच नाही, तर हा मोठा गुन्हा गुन्हा आहे."

आरपीएफ आणि जीआरपी यांना अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. रेल्वे कायद्याच्या कलम १४७ आणि १५३ अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवर खटला चालवला जाईल, ज्यामध्ये तुरुंगवास आणि मोठा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. यासंदर्भात ईस्ट कोस्ट रेल्वेने डिजिटल मीडियाद्वारे आणि गस्त वाढवून जागरूकता मोहीम तीव्र केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No More Reels Near Tracks: Railways Enforce Strict Rules!

Web Summary : Following a fatal accident, East Coast Railway prohibits filming near tracks. Violators face jail and hefty fines under railway laws. Awareness campaigns are intensified to prevent dangerous stunts and illegal access to operational areas like tracks and stations.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल