युद्धामुळे शेवगा, कलिंगड, खरबूजचे दर घसरले; भाजीपाला, फळांची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:54 IST2026-03-14T11:54:32+5:302026-03-14T11:54:45+5:30

उन्हाळा सुरू होताच भाजीपाला व फळांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने शेतीमालाच्या दरात मोठी घसरण झाली.

Due to the war, the prices of shevga, watermelon, and melon fell; the arrival of vegetables and fruits in the market committees increased | युद्धामुळे शेवगा, कलिंगड, खरबूजचे दर घसरले; भाजीपाला, फळांची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली

युद्धामुळे शेवगा, कलिंगड, खरबूजचे दर घसरले; भाजीपाला, फळांची आवक बाजार समित्यांमध्ये वाढली

नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच भाजीपाला व फळांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने शेतीमालाच्या दरात मोठी घसरण झाली.  शेवगा, कलिंगड, खरबूज यांसह द्राक्ष व डाळिंबाच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

बाजार समित्यांमध्ये भाजीपाला व फळांची आवक वाढली आहे. शुक्रवारी बाजार समितीत ९६५ टन कलिंगड दाखल झाले. गेल्या आठवड्यात १५ ते ३० रुपये प्रतिकिलो असलेले दर आता १४ ते २० रुपये आहे. खरबुजाचीही ३१९ टन आवक झाली असून, त्याचा दर २५ ते ३५ रुपयांवरून २० ते २५ रुपये प्रतिकिलो इतका घसरला. 

भाजीपाला निर्यातीवरील परिणाम हाेत असून, शेवग्याच्या शेंगांना ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता; मात्र सध्या तो २० ते ४० रुपये इतका खाली आला आहे. या हंगामातील शेवग्याच्या दरातील ही सर्वांत मोठी घसरण मानली जात आहे.

उत्पादकांना दररोज ७० लाख रुपयांचे नुकसान

निर्यात बंद झाल्याचा सर्वाधिक फटका कलिंगड आणि खरबूज उत्पादकांना बसत आहे.  सध्या बाजार समित्यांमध्ये कलिंगडाची दररोज ७०० ते ९०० टन, तर खरबुजाची ३०० ते ४०० टन आवक होत आहे. दरात झालेल्या ५ ते १० रुपयांच्या घसरणीमुळे उत्पादकांना दररोज सुमारे ५० ते ७० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतीमाल दरातील बदल

शेतीमाल     २ मार्च     १३ मार्च

शेवगा         ५० ते ७०     २० ते ४० 
दुधीभोपळा     १६ ते २४     १० ते १६ 
फ्लॉवर     ११ ते १५     ८ ते १० 
गवार         ५० ते ७०    ४० ते ६० 
कैरी         ५० ते ७०    ४० ते ५० 
कोहळा     १२ ते २२    १० ते १६ 
दोडका    २६ ते ३६    १६ ते २६ 
द्राक्ष       १०० ते १५०    ८० ते १२० 
डाळिंब    १०० ते १६०    ८० ते १५० 
कलिंगड    १५ ते ३०    १४ ते २० 
खरबूज    २५ ते ३५    २० ते २५

Web Title : युद्ध के कारण फल और सब्जियों की कीमतें गिरीं; बाजार में आवक बढ़ी

Web Summary : पश्चिम एशिया में संघर्ष के कारण निर्यात रुका, जिससे तरबूज, खरबूजा, सहजन, अंगूर और अनार की कीमतें गिर गईं। बाजार में आपूर्ति बढ़ने से किसानों को नुकसान हो रहा है, तरबूज और खरबूजा उत्पादकों को सबसे ज्यादा मार पड़ी है। दैनिक नुकसान ₹50-70 लाख अनुमानित है।

Web Title : War Causes Fruit and Vegetable Prices to Plummet; Market Influx

Web Summary : West Asia conflict halts exports, causing prices of watermelon, musk melon, drumsticks, grapes, and pomegranates to fall. Farmers face losses as market supplies surge, with watermelon and musk melon growers hit hardest. Daily losses estimated at ₹50-70 lakhs.