काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 02:57 PM2020-06-02T14:57:47+5:302020-06-02T14:59:25+5:30

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता

Dozens of militants killed by Indian Army in Kashmir Valley in 5 days MMG | काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

Next

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या त्राल येथे सुरक्षा जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली असून दोन आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या, या परिसरात सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरुवातील सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरादाखल फायरिंग केलं. त्यामध्ये, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता. त्यापैकी १३ दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला होता, त्यानंतर आज आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण १५ दहशतवाद्यांचा खात्मा गेल्या ५ दिवसांत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेंढर सेक्टरमध्ये १०, नौशेरा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सैन्याने या दहशतवाद्यांकडून २ एके ४७, अमेरिका रायफल, चीनी पिस्टल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. 

सोमवारी मनकोट आणि मेंढर सेक्टरमधील चौकीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने कव्हर फायरिंग केले. मात्र, भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला. 
 

Web Title: Dozens of militants killed by Indian Army in Kashmir Valley in 5 days MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.