खळबळजनक! डॉक्टरांनी स्टोनच्या नावावर काढली रुग्णाची किडनी, हॉस्पिटलमधून स्टाफ फरार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:22 PM2020-11-19T13:22:35+5:302020-11-19T13:23:37+5:30

एक धक्कादायक घटना समोर आली आहे जी एखाद्या सिनेमात तुम्ही पाहिली असेल. बिहारमधील एका खासगी हॉस्पिटलमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

Doctors accused took out patient kidney during stone operation Patna Bihar | खळबळजनक! डॉक्टरांनी स्टोनच्या नावावर काढली रुग्णाची किडनी, हॉस्पिटलमधून स्टाफ फरार...

खळबळजनक! डॉक्टरांनी स्टोनच्या नावावर काढली रुग्णाची किडनी, हॉस्पिटलमधून स्टाफ फरार...

googlenewsNext

(Image Credit : prachalit.com)

बिहारमधील गुंडाराजच्या किंवा विचित्र, अंगावर शहारे आणणाऱ्या घटना आपण नेहमीच बघत आणि वाचत असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे जी एखाद्या सिनेमात तुम्ही पाहिली असेल. बिहारमधील एका खासगी हॉस्पिटलमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रूग्णाला किडनी स्टोन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. ज्याचं ऑपरेशन करताना डॉक्टरांनी त्याची किडनीच काढून टाकली. यावरून रुग्णाचे नातेवाईक चांगलेच संतापले आणि त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ वाढताच हॉस्पिटलमधील स्टाफने तेथून पळ काढला. नंतर पोलिसांनी तिथे येऊन परिस्थिती सांभाळली.

NBT ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना कंकडबागच्या रोड नंबर ११ वर स्थित एका नर्सिंग होममध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी एक तरूण बेगुसरायहून आला होता आणि पोटात दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. डॉक्टरांनी त्याला सांगितले की, त्याला किडनी स्टोन आहे आणि ऑपरेशन करून तो काढावा लागेल. पण ऑपरेशननंतर रुग्णाच्या परिवाराला कळाले की, डॉक्टरने रुग्णाचा किडनी स्टोनऐवजी किडनीच काढली. 

रुग्णाला स्टोनचं कारण देत किडनी काढल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जेव्हा डॉक्टरांना माहिती देण्यात आली तेव्हा स्टाफने तेथून पळ काढला. तसेच स्थानिक लोकांनीही हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी स्थिती सांभाळली आणि लोकांना शांत केलं. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहे.

 

Web Title: Doctors accused took out patient kidney during stone operation Patna Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.