शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर थेट कारवाई नाही?

By admin | Updated: September 20, 2016 06:17 IST

मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सत्ताधारी भाजपामधील ‘साहसी’ मंडळींचा ताबडतोब ‘कारवाई’साठी दबाब वाढत असला तरी मोदी सरकारने पाकला प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजनैतिकदृष्ट्या वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. उरी येथील हल्ल्यामुळे देशभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात १८ जवान ठार तर २३ जखमी झाले. उरी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक बैठकांत आढावा घेतल्यानंतर मोदी सरकारमधील मंत्र्यांमागून मंत्र्यांनी पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी त्यांचे प्रायोजकत्व करतो, चिथावणी, मदत देतो व कटकारस्थाने करतो, असे थेट हल्ले केले. सुरवातीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोदी यांना माहिती दिली. नंतर गृहमंत्री राजनाथ सिंह, त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बैठकीत सहभागी झाले. तासाभरानंतर अर्थमंत्री अरूण जेटली सहभागी झाले व नंतर लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीला माहिती दिली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मोदी यांच्याशी फोनवर बोलल्या.व्यापक पहारा असतानाही भारतीय हद्दीत दहशतवादी घुसलेच कसे आणि दोन वर्षांपूर्वी ज्या छावणीवर हल्ला झाला होता तिच्यावरच पुन्हा कसा हल्ला झाला, या शब्दांत पंतप्रधानांनी मनोहर पर्रीकर यांच्याकडे संताप व्यक्त केला. दुसरे म्हणजे दहा दिवसांपूर्वी उरी छावणीवर हल्ला होईल असा इशारा गुप्तचरांनी दिला होता. सीमेवर आणि आतमध्ये सुरक्षा दलांकडून जो हलगर्जीपणा दाखवला गेला त्याबद्दलही मोदी संतप्त झाले. तथापि, भावनेच्या भरात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सुषमा स्वराज सध्या अमेरिकेत असून त्या संयुक्त राष्ट्रांच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत उरी हल्ल्याचा विषय उपस्थित करतील. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे संयुक्त राष्ट्रांत २१ जून रोजी बोलणार आहेत. >‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावेगृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला ‘दहशतवादी देश’ म्हटले होते तर वरिष्ठ मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला ‘मानवतेचा शत्रू’ म्हणून जाहीर करावे, असे वाटते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सकाळी ‘पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याचे आम्हाला माहीत असून, त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. दहशतवादाला खतपाणी देत असल्याबद्दल जगात पाकिस्तानचे नाव घेऊन व त्याचा निषेध करायचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पाकच्या दहशतवादी कारवायांना उघडे पाडण्यासाठी मंत्र्यांच्या तुकड्या वेगवेगळ्या देशांत पाठविल्या जाऊ शकतील. दहशतवादी हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याबद्दल कारवाई करता येईल असा पुरावा लष्करी कारवायांचे महासंचालक रणबीर सिंह यांच्याकडून त्याच्यासमोर ठेवला जाईल. सरकारच्या सावध भूमिकेची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भावनेच्या पातळीवर आम्ही कारवाई करू शकत नाही.’’ सरकारकडून घाईघाईत कोणतीही हालचाल होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.