शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान विसरलात का?; विद्यार्थ्यांच्या नावावर केवळ राजकारण करतायत राहुल गांधी, भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 20:15 IST

sudhanshu trivedi hits back on rahul gandhi remarks on paper leak and nta

एनटीए आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाच राहुल गांधी यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता भाजपनेही राहुल गांधींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फ्रेन्सला भाजपनेही प्रेस कॉन्फ्रन्सच्याच माध्यमाने प्रत्युत्तर दिले आहे. यासाठी भाजपने आपल्या सुधांशु त्रिवेदी आणि शहजाद पूनावाला या दोन तेज तर्रार प्रवक्त्यांना मैदानात उतरवले आहे. राहुल यांना प्रत्युत्तर देताना, सुधांशु त्रिवेदी यांनी केवळ प्रत्युत्तरच दिले नाही, तर बोचरे प्रश्नही विचारले. ते म्हणाले, राहुलजी राजस्थान विसरलात का? जेथे लोक सेवा आयोगाचा पेपरच फोडण्यात आला होता.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, NEET परीक्षेसंदर्भात सरकार पूर्णपणे सतर्क आणि संवेदनशील आहे. सरकार लाखो लोकांसोबत अन्याय होऊ देणार नाही. याला जे कुणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

करून दिली राजस्थानची आठवण - सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "राहुल गांधी यांना लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही. या विषयावर त्यांना केवळ आपले राजकारण चमकवायचे आहे. राजस्थानात पेपर फुटला होता. मात्र, त्यावर राहुल गांधी चकार शब्दही बोलले नाही." सुधांशू त्रिवेदी यांनी राजस्थानचे उदाहरण दिले. कारण तेथे राज्य सेवा आयोगाच्या भरतीमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची निवड करण्यात आली होती.

काय म्हणाले होते राहुल गांधी? -तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यूजीसी-नेट आणि नीट-यूजीच्या परीक्षेत झालेल्या कथित पेपर फिटीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, "सर्व शिक्षण संस्था RSS आणि भाजपाच्या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपामुक्त होत नाहीत, तोपर्यंत हे असे प्रकार सुरूच राहणार. पंतप्रधान मोदी नीट आणि नेट परीक्षेतील घोळ थांबवू शकले नाहीत. या सर्व गैरप्रकाराला जबाबदार कोण आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडले गेले पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केली. या सर्व प्रकाराची चौकशी व्हायलाच हवी, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ज्यांनी पेपर लीक केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी." आगामी लोकसभा निवडणुकीत यासंदर्भात सरकारला जाब विचारणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी