अनेकांमध्ये आढळला मधुमेह

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:35+5:302014-12-28T23:40:35+5:30

फोटो ओळ : नि:शुल्क शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. अनिता दर्डा व डॉ. संजय दर्डा.

Diabetes found in many | अनेकांमध्ये आढळला मधुमेह

अनेकांमध्ये आढळला मधुमेह

टो ओळ : नि:शुल्क शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. अनिता दर्डा व डॉ. संजय दर्डा.

आरोग्य तपासणी शिबिर : ७० वर रुग्णांनी घेतला लाभ

नागपूर : ज्योत्स्ना दर्डा स्मृती महिला कल्याण आणि विकास केंद्र धर्मार्थ दवाखानातर्फे बुटीबोरी येथे आयोजित नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिरात अनेक रुग्णांमध्ये मधुमेह आजार आढळून आला. संबंधित रुग्णांना त्यांना मधुमेह असल्याचे शिबिरात तपासणी केल्यानंतर पहिल्यांदाच माहीत झाले. रविवारी झालेल्या या शिबिराचा लाभ ७० वर रुग्णांनी घेतला.
डॉ. संजय दर्डा व डॉ. अनिता दर्डा यांनी मधुमेह, रक्तदाब, छातीत दुखणे, थकवा वाटणे, वारंवार लघुशंकेला जाणे, वारंवार तहान व भूक लागणे, जखम लवकर बरी न होणे इत्यादी समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णांना उचित मार्गदर्शन केले. मधुमेह आढळलेल्या रुग्णांना पायात जोडे किंवा चपला घालूनच चालणे, जखम झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविणे अशा सूचना डॉक्टरांनी केल्या.
सकाळी ९ ते दुपारी १ अशी शिबिराची वेळ होती. हे शिबिर नियमित आयोजित करण्यात येते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचा आजार वाढत जातो. अशा रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांची सेवा करणे हा शिबिराचा उद्देश आहे. प्रवीण बागडे यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Diabetes found in many