शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीचे आरोप असलेल्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवा

By admin | Updated: January 16, 2015 04:58 IST

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायचे झाल्यास हत्या आणि अन्य गंभीर आरोप असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जावे.

नवी दिल्ली : राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायचे झाल्यास हत्या आणि अन्य गंभीर आरोप असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जावे. निवडणुकीत समान संधी देण्यासाठी पेड न्यूज हा गुन्हा ठरविला जावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे.न्यायालयाने आरोप निश्चित केले असतील आणि त्यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होत असल्यास अशा उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली जावी. राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासंबंधी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निवडणूक कायद्यात सुधारणा घडवून आणणे सरकारच्या हाती आहे, असे मावळते मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी स्पष्ट केले आहे.निवडणूक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकताना ज्या मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत, त्यापैकी ही एक मागणी आहे. दोषी ठरविल्यानंतर लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविणे हे पुरेसे नाही, असे आम्ही फार पूर्वीपासून म्हणत आलोआहे. यापूर्वी आमदाराला दोषी ठरविण्यात आल्यानंतरही अपील करून उर्वरित कारकीर्द पूर्ण करता येत होती. अशा लोकप्रतिनिधींना तात्काळ अपात्र ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच वेळा आदेश देत सुधारणा घडवून आणली आहे. एखाद्याला निवडणूक जिंकल्यानंतर अपात्र ठरवून रिक्त जागा निर्माण करण्याऐवजी त्याला निवडणूक लढविण्याच्या टप्प्यातच अटकाव का घालू नये, असेही आयोगाने नमूद केले.पेड न्यूज हा गुन्हा ठरावा...आम्ही पेड न्यूजबाबत पावले उचलली; पण ती पुरेशी नव्हती, कारण या प्रकाराला निवडणूक गुन्हा ठरविण्यासंबंधी कोणताही कायदा नाही. आम्ही केवळ निवडणूक खर्चाच्या दृष्टीने कारवाई केली आहे. पेड न्यूज हा गुन्हा ठरविण्याची शिफारस आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे.आदर्श निवडणूक आचारसंहितेसाठी कायदा आणण्याची गरज नाही. कारण भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदीन्वये कारवाई करता येते, असे संपत यांनी एका मुलाखतीत म्हटले.संपत यांची निवृत्ती...व्ही. एस. संपत गुरुवारी ६५ वर्षांचे झाले. त्यासोबतच त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदाची कारकीर्द संपली आहे. त्यांची सहा वर्षांची कारकीर्द अनेक वादांनी गाजली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात काही वाद निर्माण झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)