शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:18 IST

उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचे वृत्त आहे. फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरले गेले होते असं तपासात समोर आले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागील एक नाही तर चार डॉक्टरांची क्रूरता उघडकीस येत आहे. यापैकी तीन डॉक्टरांना पोलिसांनी आधीच अटक केली होती आणि चौथा डॉक्टर जो फरार असल्याचं म्हटलं जात होते, त्याने अटक होण्यापूर्वीच दिल्लीत आत्मघाती हल्ला केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि आत्मघाती हल्ल्यातील संशयित मानला जाणारा डॉ. उमर मोहम्मद असल्याचं सांगितले जाते. जो अटकेच्या भीतीने फरार असल्याचे सांगितले जात होते. डॉ. उमर फरिदाबादमधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता.

डॉक्टर उमर मोहम्मदने हा स्फोट घडवून आणला

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकात झालेल्या कार बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील फरार आरोपी असल्याचे सांगितले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो स्फोटात वापरलेली I20 कार चालवत होता. अटकेच्या भीतीने त्याने घाईघाईने दोन साथीदारांसह स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग केले आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून फरार संशयिताची ओळख पटली

उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कारमध्ये ठेवल्याचे वृत्त आहे. फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटासाठी इंधन तेलासह वापरले गेले होते असं तपासात समोर आले आहे. स्फोटाचे ठिकाण आणि वेळ (लाल किल्ल्याजवळ) जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नॅरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजण्याच्या आधी स्फोटाच्या वेळी डॉ. उमर उपस्थित होता याची पुष्टी सीसीटीव्ही फुटेजवरून होते.

३ तास पार्किंगमध्ये उभी होती कार

हल्ल्यात वापरलेली कार घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदीजवळ उभी होती. ती त्या पार्किंगमध्ये दुपारी ३:१९ वाजता आली होती आणि स्फोटाच्या फक्त चार मिनिटे आधी सकाळी ६:४८ वाजता ती काढून टाकण्यात आली. सुरुवातीला ड्रायव्हर डॉ. उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता, परंतु पुढे गेल्यावर त्याने मास्क घातला होता. स्फोटाच्या वेळी संशयित कारमध्ये एकटाच होता असं दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.  कारमध्ये आणखी दोन लोक होते. हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केली असं याआधी पोलिसांनी म्हटलं होते. 

डॉ. मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर दहशतीत 

सूत्रांनुसार, डॉ. मुझम्मिल शकीलच्या अटकेची बातमी कळताच डॉ. उमर घाबरला असावा, म्हणूनच त्याने आत्मघातकी हल्ला जलद केला. हरियाणा आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत याच डॉक्टरकडून २,९०० किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. शकील हा फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात प्राध्यापक आहे.

डॉ. आदिल राथेर आणि डॉ. शाहीन यालाही अटक

पोलिसांनी आतापर्यंत फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील एकूण आठ जणांना अटक केली आहे, त्यापैकी सात जण काश्मीरमधील आहेत. डॉ. मुझम्मिल शकील उर्फ ​​मुसैब हा पुलवामा येथील कोइल येथील रहिवासी आहे. या प्रकरणात अटक केलेला दुसरा डॉक्टर आदिल राथेर हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी आहे आणि तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता. तो मोहम्मद उमरचा खूप जवळचा असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी लखनौ येथील रहिवासी असलेल्या शाहीन शाहिद या महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. ती अल फलाह विद्यापीठात डॉ. शकीलची सहकारी देखील आहे. अटक करण्यात आलेल्या या डॉक्टरांपैकी पहिला डॉक्टर अनंतनाग येथील रहिवासी २७ वर्षीय डॉ. अलिद राथेर होता, ज्याला एका आठवड्यापूर्वी श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदशी संबंधित पोस्टर्स लावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याच्या वैयक्तिक लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Four doctors involved, one a suicide bomber.

Web Summary : Four doctors linked to the Delhi blast are under suspicion. Three were arrested, while one, Dr. Umar, allegedly detonated a car bomb near the Red Fort to create terror. CCTV footage confirms his presence.
टॅग्स :Blastस्फोटdelhiदिल्लीterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला