शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही फुटेजचा सुधारुन तपास

By admin | Updated: June 16, 2014 03:52 IST

नेस वाडिया नेस वाडिया आणि प्रीती झिंटा प्रकरणी पोलिसांच्या हाती आलेले वानखेडे स्टेडियममधील ३० मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पाठवले जाणार

डिप्पी वांकाणी, मुंबईउद्योगपती नेस वाडिया नेस वाडिया आणि सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा प्रकरणी पोलिसांच्या हाती आलेले वानखेडे स्टेडियममधील ३० मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने त्याचा दर्जा सुधारण्यासाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर, त्याचा अधिक अभ्यास करण्यात येईल. या फुटेजमध्ये वाडिया आणि झिंटा यांचे चेहरे नीट ओळखता येत नसल्याने अन्य कोनांतील फुटेजही उपलब्ध आहेत का, अशी विचारणा पोलिसांनी बीसीसीआयकडे केली आहे. वाडिया यांना ओळखताना गल्लत होत आहे. काहींनी फुटेजमध्ये काळा टी-शर्ट तर काहींनी लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती वाडिया असल्याचे म्हटले. या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, आमच्या हाती आलेले सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट आहे आणि त्यात प्रेक्षक जल्लोष करतानाचे चित्रण आहे. त्यामुळे आता संघांचे मालक जेथे बसतात त्या खास कक्षाचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे. तसेच झिंटा यांनी तक्रारीत साक्षीदार म्हणून कोणाचे नाव घेतलेले नाही. त्यांनी जबाब दिल्यावरच साक्षीदारांना बोलावणे शक्य होईल. झिंटा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आयपीएल-७ स्पर्धेच्या ३० मे रोजी पंजाब इलेव्हन व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास वाडिया आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वाद झाला. त्यात मध्यस्थी केली असता वाडिया यांनी झिंटा यांना चारचौघांत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यानुसार, पोलिसांनी स्टेडियमचे फुटेज तपासणीसाठी मिळवले होते. पण ते धूसर आहे.प्रितीचा नव्याने जबाब नोंदविणारप्रीती झ्ािंटा हिने नेस वाडिया यांच्याविरुद्ध दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीप्रकरणी तिचा नव्याने जबाब नोंदवण्यात येणार आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घेतलेले दोघा साक्षीदारांचे जबाब व स्टेडियमवरील सीसीटीव्ही फुटेजची सीडी पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रिती सध्या लॉस एंजलिसमध्ये असून तेथून परतल्यानंतर तिचा जबाब घेण्यात येईल.