शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर भारतात 'कोरोना बॉम्ब' फुटेल; जागतिक आरोग्य संघटनेचा अतिगंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:52 IST

CoronaVirus News: जागतिक आरोग्य संघटनेतील प्रमुख तज्ज्ञाकडून धोक्याचा इशारा

जिनिवा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सरकारनं मिशन अनलॉकची घोषणादेखील केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकार लॉकडाऊन हटवण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. मात्र तसं केल्यास भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील एका प्रमुख तज्ज्ञानं दिला आहे.भारतामधील कोरोनाची स्थिती सध्या स्फोटक नाही. मात्र मार्चमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हटवण्याच्या दृष्टीनं भारताची वाटचाल सुरू असल्यानं जोखीम वाढली आहे, असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन स्थिती कार्यक्रमाचे संचालक मिशेल रियान यांनी व्यक्त केलं. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावघी जवळपास तीन आठवडे इतका असल्याचं रियान यांनी म्हटलं.कोरोना विषाणूचा परिणाम भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशभरात कमी-अधिक आहे. ग्रामीण, शहरी भागांची तुलना केल्यास मोठा फरक आहे. भारतासोबतच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या दक्षिण आशियातील बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील कोरोना रुग्णांची संख्या सध्या तरी नियंत्रणात आहे. मात्र ती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कायम आहे, असं निरीक्षण रियान यांनी नोंदवलं.कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणा वाढू शकते. आतापर्यंत अनेक भागांमध्ये असं घडल्याचं पाहण्यात आलं आहे, असं रियान म्हणाले. भारतात देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग आटोक्यात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र देशातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्यास रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना