शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शेतकऱ्यांसाठी राहुल गांधींनी उठवला आवाज; लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 17:37 IST

देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. 

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकर्‍यांचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. शेतीपासून बाजारापर्यंत माल पोहोचवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकऱ्यांसाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांच्या हितासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊन सुरक्षितरीत्या काढणं शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. रब्बी हंगामातील पिकं शेतात उभी राहिलेली असून, लॉकडाऊनपायी कापणीचे काम कठीण झाले आहे. यामुळे शेकडो शेतकर्‍यांची उपजीविका धोक्यात आली आहे. देशातील अन्नदाता शेतकरी आज या दुहेरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर राबविण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चपासून सुरू झाला आणि 14 एप्रिल रोजी संपणार आहे. तरीही तो पुढे वाढवण्याचा मोदी सरकारने संकेत दिले आहेत. परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासीयांचा अपमान- कॉंग्रेसदुसरीकडे परराष्ट्र धोरणात घाबरून निर्णय घेणं हा देशवासियांचा अपमान असल्याचा आरोप करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरिया औषधासंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर कॉंग्रेसने बुधवारी सरकारला फटकारले. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील परराष्ट्र धोरण व पूर्वीच्या परंपरेतून विद्यमान सरकारने काही तरी शिकले पाहिजे. त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सांगितले की, 'आम्ही जागतिक समुदायाला कुटुंब मानतो. आम्ही नेहमीच लोकांना मदत करत आलो आहोत. परंतु जर कोणी आम्हाला धमकी दिली तर ते स्वीकारले जाऊ शकत नाही. भारत कधीही कोणासमोर झुकला नाही. १९७१मध्ये बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामात ब्रिटन आणि अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. जेणेकरून इतर कुठलाही देश भारताच्या अंतर्गत विषय आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचं धाडस करणार नाही. सरकारने आपली ही परंपरा लक्षात ठेवली पाहिजे. कॉंग्रेस नेते म्हणाले, "परराष्ट्र धोरण हा एक राजकीय विषय नाही आणि यावर आम्ही आणि सर्व पक्ष सरकारबरोबर उभे आहोत, परंतु भीतीमुळे कोणताही निर्णय घेतला जाईल, तर तो देशातील १३० कोटी जनतेचा अनादर ठरेल."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी