coronavirus: देशात कोरोना चाचण्यांचा आकडा १,००,०४,१०१ पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:00 AM2020-07-07T07:00:56+5:302020-07-07T07:01:42+5:30

कोरोनाच्या चाचण्यांसाठी सध्या देशात १,१०५ प्रयोगशाळा कार्यरत असून, त्यात सार्वजनिक क्षेत्रातील ७८८ व खासगी क्षेत्रात ३१७ प्रयोगशाळांचा समावेश आहे.

coronavirus: The number of corona tests in the country has crossed 1,00,04,101 | coronavirus: देशात कोरोना चाचण्यांचा आकडा १,००,०४,१०१ पार

coronavirus: देशात कोरोना चाचण्यांचा आकडा १,००,०४,१०१ पार

Next

नवी दिल्ली : देशभरात करण्यात आलेल्या कोरोनाच्या चाचण्यांनी सोमवारी १ कोटींचा आकडा पार केला. याच दिवशी कोरोनाचे २४,२४८ रुग्ण आढळले असून त्यामुळे या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले की, ५ जुलैपर्यंत देशभरात कोरोनाच्या १,००,०४,१०१ चाचण्या पार पडल्या आहेत. कोरोनाच्या चाचण्यांसाठी सध्या देशात १,१०५ प्रयोगशाळा कार्यरत असून, त्यात सार्वजनिक क्षेत्रातील ७८८ व खासगी क्षेत्रात ३१७ प्रयोगशाळांचा समावेश आहे.

जगात बरे झालेल्यांची संख्या ६५ लाखांवर
जगभरात कोरोना रुग्णांची एकुण संख्या १ कोटी १६ लाखांच्यावर गेली असून, बळींची संख्या ५ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर या आजारातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या ६५ लाखांहून जास्त आहे.
 

Web Title: coronavirus: The number of corona tests in the country has crossed 1,00,04,101

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.