शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! नोएडातील एका कंपनीत कोरोनाचा 'विस्फोट'; तब्बल दोन डझन लोकांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:24 IST

सीजफायर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झालेली आहे.

नोएडा : नोएडातील सेक्टर १ मध्ये असलेल्या सीजफायर कंपनीला नोएडा जिल्हा प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत सील ठोकले आहे. नोएडामधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर ताबा मिळविता येत नसल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्याची कानउघडणी केली होती.

यावेळी या जिल्हाधिकाऱ्याने सुटीवर पाठविण्याची मागणी केली होती. या जिल्हाधिकाऱ्याला हटवून योगींनी तरुण जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यानंतर आज एका कंपनीमध्ये आज प्रशासनाने कारवाई केली आहे. या कंपनीचा संचालकच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनुळे २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही तर या कंपनीत काम करणारे काही गाझियाबाद आणि फरिदाबादचे कर्मचारीही कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचे धाबे दाणाणले आहेत. 

नोएडामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे.  सोमवारी दिवसभरात सहा रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सीजफायर कंपनीचा संचालकही सहभागी आहे. तर २ आणि ५ वर्षांच्या दोन मुलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. नोएडा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून हा राज्यातील सर्वाधिक आकडा आहे. 

CoronaVirus: काळीज लागते! शेतकऱ्याने पिकवलेला १५ क्विंटल गहू मोफत वाटला

सीजफायर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झालेली आहे. याचबरोबर या कंपनीच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची ८२ वर्षीय आईलाही कोरोनाची बाधा झाली आहे. या एकट्या कंपनीमुळे नोएडामध्ये २४ जणांना कोरोना झाल आहे. तर एका गावातील दुकानदार तरुणालाही कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीचा एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून परतला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. मात्र, तपासणीवेळी त्याला कोरोना असल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ