शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

CoronaVirus News : शाहीस्नान गर्दीत नियमांची पायमल्ली, महाकुंभात अंमलबजावणी करण्यास पाेलिसांची असमर्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 5:16 AM

CoronaVirus News : गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत असून काेविड नियमांचे सक्तीने पालन करण्यात पाेलिसांनी असमर्थता व्यक्त केली. 

हरिद्वार : साेमवती अमावास्येच्या पर्वावर हाेणाऱ्या महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी काेविड नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू-संत आणि महंतांना काेराेना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झाेप उडाली आहे. गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला अपयश येत असून काेविड नियमांचे सक्तीने पालन करण्यात पाेलिसांनी असमर्थता व्यक्त केली. शाहीस्नानापूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासह अनेक संतांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी महाराज यांचीही प्रकृती खालावली आहे. रविवारपासून १० हून अधिक संत पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व संतांना शाहीस्नान करता आले नाही. हरिद्वारला येण्यापूर्वी भाविकांनी काेराेना नसल्याचा रिपाेर्ट साेबत आणणे बंधनकारक केले हाेते. हरिद्वारमध्येही दरराेज ५० हजार जणांची चाचणी करण्यात येत आहे.  

सीसीटीव्हीची नजरमहाकुंभावर ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यापैकी १०० कॅमेरे सेन्सरने सज्ज असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तींचा त्यातून तत्काळ ॲलर्ट मिळणार आहे. हर की पाैडी, सुभाष घाट, ब्रह्मकुंड इत्यादी ठिकाणी अशा कॅमेऱ्यांची संख्या जास्त आहे. काेराेना नियमांसाेबतच सुरक्षेच्या दृष्टीनेही परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे.

चेंगराचेंगरीची भीतीस्नानासाठी लाखाे भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विनामास्क स्नान करताना दिसून आले. सर्वत्र साेशल डिस्टन्सिंगची पायमल्ली हाेताना आढळून आले. सातत्याने काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सक्ती केल्यास घाटांवर चेंगराचेगरी हाेण्याची भीती पाेलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी व्यक्त केली. 

मथुरेतील महाेत्सव रद्दकाेराेनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन यावर्षी मथुरेतील नवरात्री महाेत्सव रद्द करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKumbh Melaकुंभ मेळा