CoronaVirus News: परदेशातून आलेल्यांची कोरोना चाचणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:10 AM2020-05-30T00:10:15+5:302020-05-30T00:10:23+5:30

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला

CoronaVirus News: No corona test for foreigners | CoronaVirus News: परदेशातून आलेल्यांची कोरोना चाचणी नाही

CoronaVirus News: परदेशातून आलेल्यांची कोरोना चाचणी नाही

Next

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकून पडलेले भारतीय मायदेशी आल्यानंतर विमानतळाचा अपवाद वगळता त्यांची आरोग्य तपासणी केलीच जात नाही. अमेरिकेतून दिल्लीत १५ मे रोजी दाखल झालेल्या सर्व प्रवाशांना दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर विना तपासणीच घरी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला. हॉटेल लि मेरेडिअनमध्ये थांबलेल्या प्रवाशांना दहा दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकता, असे हॉटेल व्यवस्थापनानेच सांगितले. परदेशातून मायदेशी परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने हॉटेलमध्ये खोल्या अपुºया असल्याचे कारण त्यामागे देण्यात आले.अमेरिकेतून १२ मे रोजी मुंबईत दाखल झालेल्या एका प्राध्यापकास एअरपोर्टवरच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थांबावे लागले. नागपूरकर प्राध्यापक अभ्यास दौºयासाठी अमेरिकेस गेले व लॉकडाऊनमुळे अडकून पडले.

मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला खरा; पण त्यांच्यासह सहा जणांना एका नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलरमधून मुंबईहून नागपूरला रस्त्याने घरी पाठवण्याची ‘व्यवस्था’ राज्य सरकारने केली होती. हा अनुभव त्यांच्यातील एकानेच ‘लोकमत’कडे कथन केला.केंद्रीय परराष्ट्र व हवाई वाहतूक मंत्रालयाने मात्र प्रवासात पुरेशी काळजी घेतल्याचेही एका प्रवाशाने सांगितले. मात्र, दिल्लीत दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर घरी सोडण्यात आलेल्यांचा अनुभव वेगळा आहे. हॉटेलमध्ये रूमबाहेर पडण्यास मनाई होती.

अत्यंत काटोकोरपणे फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात होते. दिल्लीत विमानातून उतरल्यावर लगेचच आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना चाचणी मात्र दिल्ली व मुंबईत आलेल्या कुणाचीही झाली नाही. दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर त्यांना घरातच पुढचे १० दिवस थांबण्याची सूचना आहे. स्वयंशिस्तीने ती पाळण्याची अपेक्षा या अधिकाºयाने व्यक्त केली. 

चाचणी का नाही?

लक्षणे नसलेल्यांनाच मायदेशी आणले त्यामुळे कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाºयाने दिली.

Web Title: CoronaVirus News: No corona test for foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.