शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलावर आली आईचा मृतदेह हातगाडीवर नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 14:28 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचा मृतदेह हातगाडीवरुन नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ एका मुलावर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शेजारी आणि नातेवाईकांनी मदतीस नकार दिल्यानंतर मुलावर ही वेळ आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी देखील महिलेच्या घरी आले नाहीत. महिलेच्या मुलाने गावकऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यांनी नकार दिला. शेजाऱ्यांनी भीतीने दार-खिडक्या बंद करून घेतल्या. त्यामुळे शेवटी मुलाने आपल्या आईचा मृतदेह एका हातगाडीवर टाकून स्मशानभूमीत आणला आणि एकट्यानेच अंत्यसंस्कार केले आहेत. 

55 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी तिला 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार महिला आपल्या घरी राहत होती. याच दरम्यान तिची प्रकृती अधिक बिघडली आणि तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या धास्तीने एका कुटुंबाने आपल्याच नातेवाईकाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाचा धसका! रुग्णाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचा नकार; मुस्लीम तरुणाने घेतला पुढाकार, केले अंत्यसंस्कार

तेलंगणात ही भयंकर घटना समोर आली आहे. कामारेड्डी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयातून मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका मुस्लिम तरुणाने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. तेव्हा एका मुस्लिम तरुणाने त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू