शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

CoronaVirus News : कोरोनाचा फटका! ...तर देशात भासू शकते मिठाची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 7:39 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणाऱ्या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 52 हजारांच्या वर गेली असून तब्बल 1700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक उद्योगांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन अशाच पद्धतीने वाढत राहिला तर येणाऱ्या काळात मीठाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. 

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मीठाचे उत्पादन कमी झाले आहे. कारण कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे याठिकाणी काम करणारे मजूर घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती देशाच्या किनारपट्टी भागात मीठाचे उत्पादन घेणाऱ्या लोकांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजूरांसाठी सरकारने खास श्रमिक ट्रेन चालवल्या, जेणेकरून हे मजूर आपापल्या घरी पोहोचतील. मजुरांच्या कमतरतेमुळे मीठाचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. लवकरच याचा परिणाम मीठाच्या पुरवठ्यावर देखील दिसण्याची शक्यता आहे.

मीठ बनवण्याची प्रक्रिया ऑक्टोबर ते जून या कालावधी दरम्यान केली जाते. तर सर्वात जास्त उत्पादन मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. देशात तयार होणाऱ्या मीठापैकी 95 टक्के मीठाचे उत्पादन गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये होते. उर्वरित उत्पादन महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये होते. दरवर्षी भारतामध्ये 200 ते 250 लाख किलो मीठाचे उत्पादन केले जाते. इकोनॉमिक टाइम्सला इंडियन सॉल्ट मॅन्यूफॅक्सर्स असोसिएशन (ISMA)चे प्रेसिडेंट भरत रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धा मार्च महिना आणि पूर्ण एप्रिल महिना असाच निघून गेला. यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. 

मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. मीठाच्या उत्पादनामध्ये उन्हाळ्यातील एका महिन्यात झालेले नुकसान इतर इंडस्ट्रीमध्ये झालेल्या 4 महिन्यांच्या नुकसानाएवढे असते अशी माहिती भरत रावल यांनी दिली आहे. तसेच  या नुकसानाची भरपाई होईल की नाही हे देखील माहीत नाही. आता आमच्याकडे केवळ 45 दिवस असून मीठ उत्पादनाचे चक्र हे 60 ते 80 दिवसांचं असतं असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील काही दिवसात आमचे उत्पादन नाही वाढले तर कठीण होईल. कारण आमचा ऑफ सीझन (पावसाळा) बफर स्टॉक एवढा जास्त नाही आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन संपल्यानंतर इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मीठाची मागणी वाढेल असं रावल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती

Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूTamilnaduतामिळनाडूMaharashtraमहाराष्ट्रAndhra Pradeshआंध्र प्रदेशGujaratगुजरातRajasthanराजस्थान