लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:38 PM2020-05-07T17:38:40+5:302020-05-07T18:00:18+5:30

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला असून वेळीच सावध केले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण हे वाढले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला असून वेळीच सावध केले आहे.

एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. फसवणुकीबाबत लोकांना सावधान केले आहे.

काही भामटे बँक अधिकारी बनून ग्राहकांना फसवत असल्याचं म्हटलं आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांच्या फोन स्क्रीनचा रिमोट अ‍ॅक्सेस मिळवत असल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्राहक आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुठे तक्रार नोंदवू शकतात याबाबत बँकेने माहिती दिली आहे.

epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in. यावर तुम्ही मेल करून तक्रार दाखल करू शकता. त्याचप्रमाणे https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाईटवर जाऊन देखील तक्रार नोंदवता येईल.

एसबीआयने काही फोटो पोस्ट करत काय करायला हवं आणि काय नको यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

काही लोक बँक अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतात आणि सांगतात की तुमचं वॉलेट किंवा बँक केवायसी अवैध आहे आणि डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे. तुमची ही समस्या आम्ही ऑनलाईन सोडवू असं सांगून ते ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात.

ग्राहकांना एक मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर फसवणूक करतात याबाबत एसबीआयने ग्राहकांना माहिती दिली आहे.

फोन कॉल/ई-मेल/एसएमएस/ वेब लिंकच्या माध्यमातून कोणालाही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका असं बँकेने सांगितलं आहे.

इंटरनेटवर देण्यात आलेल्या बँकेच्या नंबरवरही विश्वास ठेऊ नका. बँके संबधित काही काम असल्यास बँकेचे अधिकृत फोन अ‍ॅप आणि वेबसाईट वापरा.

YONO SBI, YONO Lite आणि BHIM SBI Pay अ‍ॅप आहेत. तर https://bank.sbi/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

ग्राहकांनी केवळ कस्टमर केअर टोल फ्री नंबर 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 आणि टोल नंबर- 080-26599990 यावरच संपर्क करावा.