शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:12 IST

या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार की नाही, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेल्या कामांसदर्भात, तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसोबत होत असलेल्या वर्तनासंदर्भात चर्चा होईल, असे मानले जात आहे. 

ठळक मुद्देविरोधकांची ही बैठक शुक्रवारी दुपारी 3 वाजता होईल.या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार की नाही, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वबूमीवर विरोधकांनी एक बौठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची ही बैठक शुक्रवारी दुपारी 3 वाजता होईल. या बैठकीत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, डीएमके नेते एमके स्टालिन यांच्यासह 15 राजकीय पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. 

काँग्रेस भाग घेणार की नाही? अद्याप अस्पष्ट - या बैठकीत काँग्रेस सहभागी होणार की नाही, यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केलेल्या कामांसदर्भात, तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसोबत होत असलेल्या वर्तनासंदर्भात चर्चा होईल, असे मानले जात आहे. 

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

ममतांनी केला होता भेदभाव करत असल्याचा आरोप -काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या, अशा काळात केंद्राने राजकारण करायला नको. राज्य कोरोनाचा चांगल्या प्रकारे सामना करत आहे. पश्चिम बंगालला लागूनच आंतरराष्ट्रीय सीमाही आहे, हेही केंद्राला समजायला हवे.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

उद्धव ठाकरेंनी केला होता 'असा' आरोप -यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केंद्रावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, 'आम्ही केंद्राकडे दाळ मागितली, कारण आम्ही अंन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लोकांना धांन्य वाटप करतो, मात्र, आमच्याकडे केवळ तांदुळच आहेत. यामुळेच आम्ही दाळ आणि गव्हाची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही  ते आम्हाला मिळालेले नाही. मला वाटते, 'दाल में कुछ काला है' पण दाळ तर येऊ द्या. 

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

या सर्व मुद्यांवर, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांचे नेते आपली रणनीती तयार करतील, असे मणले जात आहे. एवढेच नाही, तर राज्यांनी केंद्राकडे मागीतलेल्या मदत निधीवरही, या बैठकीत चर्चा होऊ शकते. अद्याप केंद्राकडून राज्यांसाठी मदत निधीची घोषणा करण्यात आलेली नाही.

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जीShiv SenaशिवसेनाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस