A Man sayed my wife Abuse me for 10 years man may be victim of domestic violence sna | 'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

ठळक मुद्देसंबंधित युकवकाच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले होते.संभोगास विरोध केल्यास त्याची पत्नी त्याला मारहाणही करायची.अखेर एका थेरपिस्टने त्याला मदत केली.

कीव : साधारणपणे घरगुती हिंसाचाराच्या घटना महिलांच्या बाबतीत होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यूक्रेनमधील एका व्यक्तीने, आपल्या पत्नीनेच आपल्यावर तब्बल 10 वर्ष बलात्कार केल्याचा दावा केला आहे. त्याने सातत्याने मानसिक त्रासही दिल्याचे म्हटले आहे.

बीबीसी यूक्रेनने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, यूक्रेनमधील एका युवकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आपली वेदनादायक कहाणी सांगितली. या युवकाने सांगितल्यानुसार, त्याला काही दिवसांपूर्वी, त्याची पत्नीच त्याच्यावर 10 वर्षांपासून बलात्कार करत असल्याची अनुभूती झाली. त्याच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्रास दिल्याचे म्हटले आहे. 

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

विरोध केला तरीही पत्नी थांबली नाही -
संबंधित युवकाने सांगितले की, तो, अशा प्रकारच्या पत्नीच्या त्रासला होता. मात्र, विरोध करूनही ती थांबली नाही. त्याच वेळी त्याच्या मनात आले, की पुरुषांवरही बलात्कार होऊ शकतो. युवकाच्या मते, ऑफीसमधून घरी आल्यावर, त्याला आराम करावा वाटे. मात्र, ती त्याला संभोगासाठी आग्रह करत होती. त्याने अधिक विरोध केला तर ती त्याला मारहाण करायची. विकेंडच्या दिवशी तर या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास व्हायचा.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

अशी मिळाली मदत -
या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एका थेरपिस्टने त्याला मदत केली. थेरपी सेशनमध्ये त्याला आणि त्याची पत्नी इरा, यांना एक मेकांशी बोलावे लागे. यावेळी, जेव्हा तो बोलत असेल तेव्हा इराला त्याला टोकण्यास मनाई होती. याच सेशनमध्ये त्याने सर्वप्रथम त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांची वाच्चता केली होती. यावेळी इरा अत्यंत संतापली होती. यानंतर तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानेही सहमती दर्शवली. ज्यादिवशी त्याला घटस्फोटाचे कागद मिळाले तो त्याच्यासाठी सर्वात आंनंदाचा दिवस होता, असेही युवकाने म्हटले आहे.

आणखी वाचा -

CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A Man sayed my wife Abuse me for 10 years man may be victim of domestic violence sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.