CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 07:05 PM2020-05-17T19:05:27+5:302020-05-17T20:11:02+5:30

भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल.

CoronaVirus Marathi News india will become chairman of who executive board sna | CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

googlenewsNext
ठळक मुद्देभारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे  लक्ष असणार आहे.कोरोनाची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाली आहे.

नवी दिल्ली :भारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे. कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे  लक्ष असणार आहे. चीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे. 

भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

चीनच्या वुहानपासून सुरूवात -
कोरोनाची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाली. आता त्याने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगात जवळपास 45 लाख लोक कोरोनाच्या चपाट्यात सापडले आहेत. तर 3लाखहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यापार्श्वभूमीवर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी चीनविरोधात चौकशी करू शकतात. या प्रकरणाचा तपास व्हावा, असे या देशांच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. हा व्हायरस कुठून आला? चीनने सुरुवातीला यासंदर्भात माहिती लवपण्याचा प्रयत्न केला का? हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रांसमिट होतो, हे सांगायला चीनने उशीर केला का? हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. 

गडकरींचा आरोप -
नुकतेच, कोरोना व्हायरस हा नैसर्गिक नाही आणि हा लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरीनी म्हटले होते. कोरोनाच्या मुद्द्यावर भारतकडून आलेले हे अधिकृत वक्तव्य होते. डब्ल्यूएचओमध्ये सुधारणा व्हावी, असेही भारत सातत्याने म्हणत आला आहे. 

आणखी वाचा - CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

डब्ल्यूएचओवर चीनला वाचवण्याचा आरोप -
कोरोनाप्रकरणी डब्ल्यूएचओची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. चीनने कोरोनासंदर्भात जगाला वेळ असतानाच माहिती दिली नाही. तसेच, यासंदर्भात आवाज उठविणाऱ्यांचे आवाज दाबण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तरीही डब्ल्यूएचओ चीनचेच गुणगान करत आहे, असे आरोप डब्ल्यूएचओवर होत आहेत. डब्ल्यूएचओचे  प्रमुख डॉ. टेड्रोस एडहेनॉम यांच्यावरही चीनचा गुन्हा लपवण्याचा आरोप होत आहे आणि त्यांना राजीनामाही मागितला जात आहे.

आणखी वाचा - CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

 

Web Title: CoronaVirus Marathi News india will become chairman of who executive board sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.