CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 03:12 PM2020-05-17T15:12:00+5:302020-05-17T15:28:22+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या पाशात घेतले आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक देशांत नवनवीन प्रयोग केले जात आहे. असाच एक प्रयोग इग्लंडमध्येही केला जात आहे. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटवण्यासाठी श्वानांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

केवळ वास घेऊन कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देणाऱ्या श्वानांचे प्रशिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण झाले आहे. आता रुग्णांमधील कोरोनाच्या लक्षणांची ओळख करण्यासंदर्भात लवकरच एक ट्रायलही सुरू केली जाणार आहे. यासाठी सरकारने जवळपास साडे चार कोटी रुपये खर्च केले आहेत.

डेली मेलच्या एका वृत्तानुसार, कोरोनाच्या लक्षणांची ओळख होण्यासाठी श्वानांवर करण्यात येणाऱ्या या ट्रायलमध्ये यश मिळाले, तर संशोधनाच्या दुनेयेत हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाईल.

या ट्रायलचे सर्व सूत्र, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम), चॅरिटी मेडिकल डिटेक्शन डॉग्स आणि डरहम युनिव्हर्सिटी यांच्या हाती असतील. एलएसएचटीएमचे प्राध्यापक जेम्स लोगन यांना या ट्रायलकडून मोठी आशा आहे.

संशोधकांनी या रिपोर्टमध्ये दावा केला आहे, की या ट्रायलला यश मिळाले, तर श्वान एक तासांत जवळपास 250 जणांमध्ये व्हायरस डिटेक्शनचे काम करू शकतात. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, अशा रुग्णांनाही हे श्वान ओळखू शकतील.

या अनुशंगाने विचार केल्यास हे श्वान टेस्टिंग किटपेक्षाही अधिक वेगाने काम करू शकतील. लॅबमध्ये कोरोनाच्या एका टेस्टसाठी जवळपास 5 ते 6 तासांचा वेळ लागतो. इतर प्रोसेस पूर्ण झाल्यानतंर काही तासांनी याचा रिपोर्ट मिळतो.

माणसांच्या तुलनेत श्वानांची घ्राणेंद्रिय 10 हजार पट तीक्ष्ण असतात. लॅब्राडोर्स आणि कूकर स्पॅनियल्स सारख्या जातींच्या श्वानांनी, यापूर्वीही मानवाच्या शरिरात कॅन्सर, मलेरिया आणि पार्किंसन सारख्या आजारांचा शोध घेण्याचे काम केले आहे.

कोरोना व्हायरसला पुन्हा दुसऱ्यांदा, डोके वर काढण्यापासून रोखण्यासाठी श्वान अत्यंत उपयोगी ठरू शकतात, असे डरहम विद्यापीठातील प्राध्यापक स्टीव लिंडसे यांनी म्हटले होते.

श्वानांना डिटेक्शनसाठी एअरपोर्ट सारख्या संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येते. ड्रग्स आणि स्फोटकांचा वास घेऊन ते ओळखण्याची क्षणता श्वानांमध्ये असते.

श्वासनक्रियेशी संबंधित काही आजार आपला दुर्गंध बदलण्यासाठीही ओळखले जातात. यामुळे या ट्रायलमध्ये श्वानांसमोर मोठे आव्हानही असेल. मात्र, श्वानांच्या नाकापासून बचाव करणे व्हायरससाठीही सोपे नसेल.

कुठल्याही प्रकारचा गंध ओळखण्यात हे श्वान तरबेज असतात. ऑलम्पिकमध्ये असतात तशा, स्विमिंग टँकमध्ये एक चमचा साखरही टाकली. तरीही त्याचा शोध हे श्वान सहजपणे घेऊ शकतात.