CoronaVirus Marathi News lockdown 7 laborers died one day journey SSS | CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू; कारण वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली -  देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. 1 जूनपासून दररोज 200 स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. तसेच  मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवासात एकाच दिवशी 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान अनेक मजुरांचा हा वेगवेगळ्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र रेल्वे प्रवासातही मजुरांचा मृत्यू होत आहे. प्रवासादरम्यान अन्नपाण्यावाचून आणि उष्णतेमुळे मजुरांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या तब्बल सात प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात एका आठ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. कोरोनाशी सामना करण्यापूर्वीच अन्नपाण्याची कमतरता आणि वाढता उन्हाळा यामुळे मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सोमवारी 'या' प्रवासी मजुरांचा झाला मृत्यू

- पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी इरशाद यांचा मुजफ्फरपूर जंक्शन येथे मृत्यू.

- 55 वर्षीय अनवर यांचा बैरोनी येथे मृत्यू झाला. मुंबईतून सुरू केला होता प्रवास

- सूरतहून येणाऱ्या रेल्वेत औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेचा सासाराम स्टेशनवर मृत्यू

- महाराष्ट्रातून येणाऱ्या मोतिहारीच्या मजुराचा जहानाबादमध्ये मृत्यू

- मुंबईहून सीतामढीला निघालेल्या कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाचा कानपूरमध्ये मृत्यू

- अहमदाबादहून कटिहारला जाणाऱ्या अलवीनाचा रेल्वे प्रवासात मृत्यू

प्रवासी मजुरांच्या मृत्यूवर रेल्वे अधिकारी म्हणतात...

रेल्वेला होणारा विलंब आणि रेल्वेतील अन्नपाणी सुविधेबाबत पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, कोणत्याही मजुराचा भूकेमुळे मृत्यू झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यातील काही मजुरांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांना सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत रेल्वेतर्फे वेळेवर जेवण दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

निरनिराळ्या स्टेशनांवर यासाठी फूड सेंटर उभारण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर येते, तेव्हा रेल्वेतील सर्वांना अन्न-पाणी दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक रेल्वे या बऱ्यापैकी वेळेवर धावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांना काहीसा विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र कोणतीही रेल्वे ही पाच किंवा सात दिवसांच्या उशिराने धावत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News lockdown 7 laborers died one day journey SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.