CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:45 PM2020-05-26T14:45:51+5:302020-05-26T14:58:38+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिला आहे.

CoronaVirus Marathi News countries covid 19 second wave of disease SSS | CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

Next

जिनिव्हा - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 348,194 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,603,558 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,381,855 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कोरोनच्या संकटाचा सर्वच देश सामना करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिला आहे. कोरोनामुळे गंभीर स्थिती असलेल्या अनेक देशांमध्ये आता कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र या देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा WHO ने दिला आहे. काही देशांनी लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. यामुळेच कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो असं आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे इमर्जेंसी हेड डॉ. माइक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रीका या ठिकाणी कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये रुग्ण संख्येत घट असली तरी या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट उसळणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर देखील आपल्या घरापासून दूर राहून कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

धक्कादायक! 100 वॅटचा बल्ब लावला म्हणून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

Web Title: CoronaVirus Marathi News countries covid 19 second wave of disease SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.