CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:22 AM2020-05-27T08:22:27+5:302020-05-27T08:28:21+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान कोरोना चाचणीतील निष्काळजीपणा समोर आला आहे.

CoronaVirus Marathi News corona testing 6 healthy people meerut positive SSS | CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

Next

मेरठ - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान कोरोना चाचणीतील निष्काळजीपणा समोर आला आहे. खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुग्रामच्या एका खासगी पॅथॉलॉजी लॅबवर चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासगी लॅबमधील आठ पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी सहा रिपोर्ट हे सरकारी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत निगेटिव्ह आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गुरुग्रामच्या मॉडर्न डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरच्या तपासणीत अनेक प्रकरणं पॉझिटिव्ह समोर आली होती. एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्यावर आरोग्य विभागाला थोडा संशय आला. त्यातच आणखी आठ नमुने पॉझिटिव्ह आले. आरोग्य विभागाने संशयाच्या आधारे डीएमला माहिती दिली. त्यानंतर या प्रयोगशाळेच्या तपासणीस प्रतिबंधित करीत डीएमने तत्काळ सीएमओला लॅबविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे. आठ पॉझिटिव्ह अहवालांशी संबंधित व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आणि त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले. तपासणीत आठ पैकी सहा अहवाल निगेटिव्ह असल्याच आढळलं. 

खासगी लॅबमध्ये सुरू असलेल्या कोरोना चाचण्या थांबवण्यात आल्या आहे. तसेच सीएमओ आणि सरकारला पत्र लिहून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. लॅबचा परवाना रद्द करण्याचीही सरकारने शिफारस केली आहे. मेरठचे डीएम अनिल ढींगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी लॅबची मोठी उपेक्षा आहे. आठ पैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले. त्या आधारे लॅबचा परवाना रद्द करावा आणि कायदेशीर कारवाई करावी असं पत्र सरकारला पाठवण्यात आलं आहे. तसेच सीएमओलाही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या 'या' देशांत दुसऱ्या लाटेचा इशारा

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! तब्बल 68 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर 'या' योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

Web Title: CoronaVirus Marathi News corona testing 6 healthy people meerut positive SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.