CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:48 AM2020-05-26T11:48:56+5:302020-05-26T11:54:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: खाद्यपदार्थांच्या पॅकेटसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर ही घटना घडली आहे. 

CoronaVirus Marathi News migrant labour snaches food items itarsi station SSS | CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

Next

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खाद्यपदार्थांच्या पॅकेटसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर ही घटना घडली आहे. 

लॉकडाऊन दरम्यान श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारकडून काही श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. अशाच एका रेल्वेतील भुकेलेल्या प्रवाशांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मध्य प्रदेशच्या इटारसी जंक्शनवर सकाळी साधारण आठ वाजता श्रमिक रेल्वे पोहचली. या रेल्वेतील प्रवाशांसाठी काही ब्रेडची पॅकेटस एका ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती. जवळपास तीन बोगींमधील प्रवासी खाद्यपदार्थ पाहून स्टेशन प्लॅटफॉर्मवर उतरले. 

रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बोगींमध्ये परत जाण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी एका प्रवाशाने पॅकेट उचलून पळण्यास सुरुवात केली. इतर प्रवाशांही अशाच पद्धतीने खाद्यपदार्थ पटापट उचलण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. पॅकेटवरून प्रवासी आपापसात भिडले आणि स्टेशनवर एकच राडा झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी बिस्किटांच्या पुड्यांसाठी रेल्वे स्टेशनवर जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली होती. बिहारच्या कटिहार स्टेशनवर ही घटना घडली होती.

कटिहार रेल्वे स्टेशनवर प्रवास करणाऱ्या मजुरांना खाण्यासाठी बिस्किटचे काही पुडे देण्यात आले. मात्र बिस्किटांसाठी मजुरांमध्ये झटापट झाली आणि एकच गोंधळ झाला. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये कटिहार स्टेशनवर श्रमिकांची गाडी थांबली असताना त्यांना खाण्यासाठी बिस्किटांच्या पुड्यांचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र ते करण्याआधीच या पिशवीवर मजूर तुटून पडल्याचं दिसलं. तसेच एकमेकांच्या हातातील बिस्किटांचे पुडे खेचून घेण्यासाठी झटापट सुरू झाली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

'पंतप्रधान मोदींच्या आरतीनंतर आता बांधणार मंदिर'; भाजपा आमदाराची घोषणा

धक्कादायक! 100 वॅटचा बल्ब लावला म्हणून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

Web Title: CoronaVirus Marathi News migrant labour snaches food items itarsi station SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.