CoronaVirus Marathi News india imcr says still far away from the peak SSS | CoronaVirus News : देशातील रुग्णांची संख्या 2 लाखांवर; कोरोनाच्या संकटात ICMRने दिली दिलासादायक माहिती

CoronaVirus News : देशातील रुग्णांची संख्या 2 लाखांवर; कोरोनाच्या संकटात ICMRने दिली दिलासादायक माहिती

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अमेरिका, इटली, स्पेन यासारख्या देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सातत्याने मृतांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांवर पोहोचली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, गेल्या केवळ 15 दिवसांतच हा आकडा एक लाखांवरून दोन लाखांवर गेला आहे. तर तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) एक दिलासादायक माहिती दिली आहे. 

ICMR ने देशामध्ये कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे असं म्हटलं आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये रोज 8000 हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यावरून भारतात कोरोनाचा पीक सीझन आल्याचे मानले जात होते. मात्र ICMRच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी भारत कोरोनाच्या पीकपासून खूप दूर आहे अशी माहिती दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आमचे प्रयत्न आणि सरकारने घेतलेले निर्णय खूप प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. हेच कारण आहे की इतर देशांपेक्षा आपली परिस्थिती बर्‍यापैकी चांगली आहे असं म्हटलं आहे. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही जून किंवा जुलैमध्ये भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल. कोव्हिड-19 ची प्रकरणं भारतात कधी वाढतील, याचे उत्तर मॉडेलिंगच्या आकडेवारीवर अवलंबून असेल. दोन्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ डेटाचे विश्लेषण करीत आहेत. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांचा असा अंदाज आहे की जून किंवा जुलैमध्ये भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होईल असं म्हटलं आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते जेव्हा एखादा संसर्गजन्य रोग पीकवर पोहोचतो तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्याचा उद्रेक संपला आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वात वाईट परिस्थिती संपली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, दुसरीकडे रिकव्हरी रेटदेखील वाढत आहे. 19 मे रोजी 1 लाखाहून अधिक कंफर्म रुग्णांपैकी 39 हजार जण बरे झाले आहेत. याचा अर्थ 19 मेपर्यंत रिकव्हरी रेट 40 टक्के होता. तर 3 जूनपर्यंत 2 लाख कंफर्म रुग्णांपैकी एक लाखहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ते बरे होऊन घरी परतले आहेत. याचाच अर्थ आता रिकव्हरी रेट 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन

CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News india imcr says still far away from the peak SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.