CoronaVirus Marathi News bhopal corona warrior daughter asking help from cm SSS | CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाख 90 हजारांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. मात्र याच दरम्यान काही कोरोना योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

कोरोना योद्ध्याच्या एका लेकीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा मृत्यू झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने आणि चिमुकलीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मदत मागितली आहे. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय असं म्हणत चिमुकलीने पत्र लिहिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टीटी नगर परिसरात राहणारे योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा कृष्णा, पत्नी रेखा आणि आई विमला हे सगळे कोरोनाला हरवून घरी परतले. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातील कर्ता व्यक्ती असलेल्या योगेंद्र यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे शेवटी कोरोना योद्ध्याच्या पत्नीने आणि मुलीने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली. पाच वर्षांच्या तनिष्काने मुख्यमंत्र्यांना एक व्हिडीओ मेसेज आणि पत्र पाठवलं आहे. 

चिमुकलीने बाबांचं स्वप्न पूर्ण करुन पोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाळेत शिक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे. सध्या उत्पन्नाचं कोणतंही साधन कुटुंबाकडे नाही हेही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरी नाही आणि त्यांची मुलंही सध्या शिक्षण घेत आहेत. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरीची सर्वाधिक गरज असून नोकरी मिळावी यासाठी त्यांनी शिवराजसिंह यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची भेट होऊ शकलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News bhopal corona warrior daughter asking help from cm SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.