CoronaVirus Marathi News drdo developes ultra swachh disinfection unit covid19 SSS | CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. काही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. 

फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो. आता काळजी करण्याचं काही गरज नाही कारण रोजच्या वापरतील फोन, पैसे यासह इतरही वस्तू या तंत्रज्ञानाच्या मदतीने सॅनिटाईज करता येणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डिआरडीओने (DRDO) कोणताही संपर्क न करता वस्तू निर्जंतूक करणारे उपकरण विकसित केले आहे. अल्ट्रा स्वच्छ डिसइन्फेक्शन युनिट म्हणजेच एक कपाट तयार करण्यात आले आहे. यामध्ये वस्तू ठेवताच त्या कोरोनामुक्त होणार आहेत.

DRDO ने तयार केलेल्या युनिटमध्ये पीपीई सूट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवून त्या व्हायरसमुक्त करता येऊ शकतात. या युनिटचा वापर सरकारी कार्यालयांमध्येही होतो आहे. काही दिवसांपूर्वी डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत असंच एक उपकरण तयार करण्यात आलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयुएस) असे या उपकरणाचे नाव ठेवण्यात आलं आहे. सर्व प्रकारचे फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा यासह काही वस्तू या उपकरणाच्या माध्यमातून निर्जंतूक करता येणार आहेत.

उपकरणाला एक प्रोक्झिमिटर सेन्सर बसवण्यात आले आहे. उपकरण सुरू केल्यावर ते स्वतः वस्तूंच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतं. डीआरयुएस उपकरणात फोनसह इतरही वस्तू निर्जंतूक केल्या जातात. निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यावर उपकरण स्वतःहून स्लिप मोडमध्ये जातं. ही सर्व प्रक्रिया पूर्ण असताना मानवी संपर्काची गरज भासत नसल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 54 दिवसांचा लढा, 30 दिवस व्हेंटिलेटर; 5 महिन्यांच्या चिमुकलीने जिंकलं कोरोनाचं युद्ध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Web Title: CoronaVirus Marathi News drdo developes ultra swachh disinfection unit covid19 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.