CoronaVirus Marathi News family left dead body road fearing corona SSS | CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! आपलेही झाले परके... रस्त्यावर सोडून दिला मृतदेह

प्रयागराज - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 90 हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने कुटुंबियांनी रस्त्यावरच आपल्या कुटुंबियातील सदस्याचा मृतदेह  सोडून दिल्याची घटना घडली आहे. खरं तर या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झालाच नव्हता. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी ही व्यक्ती मुंबईहून प्रतापगड जिल्ह्यात परतली होती.

प्रकृती बिघडल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. प्रतापगड-प्रयागराज महामार्गावर राणीगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाजवळ लोकांनी मृतदेह पडलेला पाहिला. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला असता कोरोनाच्या भीतीमुळे मृताच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह रस्त्यातच सोडल्याची माहिती समोर आली. 


 
राणीगंजच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी ही व्यक्ती गावात आली होती. तब्येत खालावल्याने कुटुंबियांनी त्याला प्रयागराजमधील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी औषध दिले आणि काही अडचण आल्यास परत येण्यास सांगितले. मात्र घरी जातानाच व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांना वाटले की कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. त्यांनी मृतदेह रस्ताच्या कडेला ठेवला आणि ते घरी निघून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

TikTok चं वेड, जिवाशी खेळ; व्हिडीओ करताना झालं असं काही अन्...

CoronaVirus News : कोरोना योद्ध्यांसाठी 'ही' औषधी ढाल फायदेशीर ठरणार, व्हायरसपासून रक्षण होणार

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

CoronaVirus News : प्रियंका गांधींनी श्रमिक ट्रेन्सबाबत केलेल्या ट्विटला रेल्वेने दिलं उत्तर; म्हटलं...

CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...म्हणून नवजात बाळाला नर्सने पाजलं दूध; तुम्हीही कराल सलाम

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News family left dead body road fearing corona SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.