शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 08:57 IST

रविवारपर्यंत सीआरपीएफकडे 1510 पॉझिटिव्ह प्रकरणे होती, त्यापैकी 755 ऍक्टिव्ह आहेत.

निमलष्करी दलांच्या जवानांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोनानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आतापर्यंत 27 जवानांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 18 जवानांचा मृत्यू केवळ जून महिन्यात झाला. त्याच वेळी संक्रमित जवानांची संख्या 4800च्या पलीकडे गेली आहे. त्यातील केवळ 1905 प्रकरणे सध्या ऍक्टिव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सीआरपीएफच्या नऊ जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यातील सात जवानांचा जूनमध्ये मृत्यू झाला. रविवारपर्यंत सीआरपीएफकडे 1510 पॉझिटिव्ह प्रकरणे होती, त्यापैकी 755 ऍक्टिव्ह आहेत. त्याच वेळी सीआयएसएफमध्ये आठ जवानांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी गेल्या महिन्यात चार जवानांचा मृत्यू झाला. सीआरपीएफमध्ये कोरोनाची 1021 प्रकरणे आढळली आहेत.

त्यापैकी 38 टक्के ऍक्टिव्ह आहेत. तसेच बीएसएफमध्येही 1300हून अधिक प्रकरणे सापडली असून, पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात तिघांचा मृत्यू झाला. आयटीबीपीमध्ये 425 प्रकरणे आढळून आली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. एसएसबीमध्ये १५३ जवानांना संसर्ग झाला असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.

रेल्वेचे 872 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय संक्रमित
मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये 872 कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  त्यापैकी 86 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिका -यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांना पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण प्रकरणांपैकी 559 मध्य रेल्वेची आणि 313 पश्चिम रेल्वेची आहेत. सध्या रुग्णालयात २२ कर्मचारी आहेत, तर उर्वरित कुटुंब आणि सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. रेल्वे संघटनांनी असा दावा केला आहे की, 15 जूननंतर लोकल गाड्या सुरू झाल्यापासून संक्रमित कामगारांची संख्या वाढली आहे.

केंद्रीय मंत्री प्रताप सारंगींना ठेवले अलग  
ओडिशाचे बालासोरचे आमदार सुकांतकुमार नायक यांना कोरोनाला संसर्ग झाल्याची खात्री पटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी अलग ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या दोन कार्यक्रमात आमदाराने सारंगीसोबत स्टेज सामायिक केला होता. सारंगी म्हणाले, 2 आणि 3 जुलै रोजी त्यांनी सुकांतसोबत दोन कार्यक्रमात हजेरी लावली होती. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमदार सुकांतकुमार यांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर सारंगी यांना अलग करण्यात आले आहे. 

ओडिशामध्ये रुग्णांची संख्या 10,000च्या पार
ओडिशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 571 नवीन प्रकरणे आढळून आल्यानंतर रुग्णांची संख्या 10,000च्या पार गेली आहेत. त्याचबरोबर साथीच्या आजाराने आणखी चार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 42वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी सांगितले की, राज्यात संक्रमितांची एकूण संख्या 10,097 आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमधून नवीन प्रकरणे समोर आली आहेत आणि गंजममध्ये तीन आणि कटकमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या