Coronavirus: Hospital mismanagement! Given varanasi deputy cmo deadbody replace another body by BHU | भोंगळ कारभार! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह चितेवर ठेवला, इतक्यात...

भोंगळ कारभार! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह चितेवर ठेवला, इतक्यात...

वाराणसी – सध्या देशभरात कोरोनाचं थैमान आहे. २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४० हजाराहून जास्त मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा सर्वसामान्य लोकांना फटका बसत असल्याचं दिसून आलं. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचेही धक्कादायक प्रकार घडले.

कोरोनामुळे मरणाऱ्या रुग्णांचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये पॅक करुन देण्यात येतो. अशातच रुग्णालयाच्या हलगर्जीपणा उघड झाला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जिल्ह्याचे उपमुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याऐवजी रुग्णालयाला प्रशासनाने दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सोपवला. त्यानंतर रुग्णालयाने या अधिकाऱ्याचा मृतदेह हरिशचंद्र घाट येथे पाठवला तेव्हा कुठे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीचे डेप्युटी सीएमओ डॉ जंग बहादूर यांना कोरोनाची लागण झाली होती. चाचणी अहवालात पॉझिटिव्ह आल्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) च्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या डेप्युटी सीएमओचा मंगळवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना नियमावली अंतर्गत बुधवारी बीएचयूच्या शवगृहातील कर्मचाऱ्यांनी डेप्युटी सीएमओ डॉ जंग बहादूर यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांसह रॅपर पॅक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशान घाटावर पोहचवला.

कोरोना नियमावलीनुसार अंत्ययात्रा जवळजवळ पूर्ण झाली होती. मृतदेह विद्युत शवदाहिनीवर ठेवला असताना त्याठिकाणी गाझीपूर येथे राहणारे केशवचंद्र श्रीवास्तव यांचे कुटुंब हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृतदेहाची माहिती दिली. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली. डॉ जंग बहादूर यांचा मृतदेह अद्याप शवगृहात असल्याची पुष्टी बीएचयू प्रशासनाने केली. यानंतर डिप्टी सीएमओचे नातेवाईक बीएचयूला पोहोचले आणि त्यानंतर डॉ जंग बहादूर यांचा मृतदेह आणून हरिश्चंद्र घाट येथे अंत्यसंस्कार केले.

श्रीवास्तव कुटुंबानेही कोणताही विरोध न करता पुढील प्रथा पूर्ण केल्या. नंतर सीएमओ कार्यालयानेही या विषयावर स्पष्टीकरण दिले. सीएमओ कार्यालयाने आपली चूक कबूल केली. वाराणसीत डेप्युटी सीएमओ म्हणून तैनात असलेले डॉक्टर जंग बहादूर यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?  

‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही’; शरद पवारांच्या विधानावार पार्थ पवार म्हणाले...

पार्थ पवार अपरिपक्व, मागणीला कवडीची किंमत देत नाही - शरद पवार 

संयम सुटला! भाजपा समर्थकांना संतप्त लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; खासदार थोडक्यात बचावले

महापालिकेला पोलिसांवर भरवसा नाय का?; पहिल्यांदाच बीएमसीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स तैनात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Hospital mismanagement! Given varanasi deputy cmo deadbody replace another body by BHU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.