शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: खासगी रुग्णालयांचा ताबा मिळवा अन् विलगीकरण कक्ष सुरू करा, जगनमोहन रेड्डी सरकारचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 17:55 IST

सर्वच खासगी रुग्णालयं सरकारच्या अंतर्गत आल्यानं आता तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात.

देशभरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेलं असतानाही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाच्या या लढ्यात आता उद्योगपती आणि सामाजिक संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मोदी सरकारच्या प्रयत्नांना इतर राज्य सरकारेही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आंध्र प्रदेशमधल्या जगनमोहन  रेड्डी सरकारनंही मोठा निर्णय घेतला आहे. जगनमोहन रेड्डींनी सर्वच खासगी रुग्णालयांचा ताबा घेण्याचा आदेश दिला असून, तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यास सांगितलं आहे. सर्वच खासगी रुग्णालयं सरकारच्या अंतर्गत आल्यानं आता तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात.आंध्र प्रदेशात कोरोनाचे २३ रुग्ण आढळलेले असून, रेड्डी सरकारनं सतर्कतेची पावलं उचलली आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा सर्वच खासगी रुग्णालयं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर खासगी रुग्णालयंही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना रुग्णालयात पोहोचणं शक्य नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. पण आता ती रुग्णालयं पुन्हा तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सोशल डिस्टन्सिंगद्वारे रुग्णांवर उपचार करणं शक्य असल्याचं सांगत रुग्णालयांमध्ये औषधं आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी सांगितलं आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाझियाबाद प्रशासनाने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या