शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतातील ८६ टक्के मृतांमध्ये एक गोष्ट समान; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 07:38 IST

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्‍ट करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली:  भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी ३५४ नव्या लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहितीआरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली होती. तसेच आतापर्यत ११४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

लव अग्रवाल यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३० टक्के रुग्णांचे वय ४० ते ६० या दरम्यान होते व ७ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यचं प्रमाण 37 टक्के असलं तरी 86 टक्के लोकं अशी आहेत, ज्यांना आधीपासून कोणता ना कोणता आजार होता. त्यामुळे ज्या तरुणांना असे आजार आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका आहे. त्यामुळे अशा तरुणांनी विशेष काळजी घ्यावी अशी विनंती लव अग्रवाल यांनी केली. तसेच भारतात  महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरचा प्रभाव जास्त आहे. भारतात आतापर्यंत 76 टक्के पुरुषांना कोरोनाची लागण झाली असून मृतांमध्येही 73 टक्के पुरुष आहे, असं लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्‍ट -

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्‍ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू