कोलकाता - प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असताना भाजपचे माजी नेते व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये चंद्रकुमार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरुद्ध भवानीपूरमधून निवडणूक लढवली होती.
कोलकात्यात तृणमूल भवन येथे त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू व खा. कीर्ती आझाद यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. भाजप संविधान व नेताजींच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात आहे, अशी टीका चंद्रकुमार यांनी यावेळी केली.
२०२३ मध्ये चंद्रकुमार यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करणे ही माझी चूक होती आणि आता तृणमूलमध्ये प्रवेश करून मी ती चूक सुधारली आहे.
केंद्र व १९ राज्ये विरोधातकेंद्र व १९ राज्ये आपल्या विरोधात एकत्र आली आहेत, असा दावा करून आपण एकट्याच सामान्य जनतेसाठी या सर्वांशी संघर्ष करीत असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी बीरभूम जिल्ह्यात सूरी येथे आयोजित जाहीर सभेत सांगितले.भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची देशातील १९ राज्यांमध्ये सत्ता आहे. मात्र, केंद्रातील सत्तेचा वापर करून हा पक्ष पश्चिम बंगालची निवडणूक जिंकू शकणार नाहीत, असे ममता म्हणाल्या.
Web Summary : Chandrakumar Bose, Netaji's grandson, joined Trinamool Congress, citing disillusionment with BJP's ideology. He admitted his BJP stint was a mistake now rectified. Mamata Banerjee claims she fights alone against the center and 19 states.
Web Summary : नेताजी सुभाष चंद्र बोस के पोते चंद्रकुमार बोस भाजपा छोड़कर तृणमूल कांग्रेस में शामिल हो गए। उन्होंने भाजपा की विचारधारा से मोहभंग होने का हवाला दिया और कहा कि भाजपा में शामिल होना एक गलती थी जिसे अब सुधारा गया है। ममता बनर्जी का दावा है कि वह अकेले केंद्र और 19 राज्यों से लड़ रही हैं।