Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:30 IST

Open in App
1 / 10

आपल्याकडे इंग्रजीत एक म्हण म्हटली जाते, 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' IPL मध्ये डेब्यू करणाऱ्या प्रफुल हिंगेसोबत असेच काही घडले. तेव्हाच त्याने आपल्या पहिल्या चेंडूत क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. IPL च्या इतिहासात याआधी असं कुणीच केले नव्हते.

2 / 10

IPL डेब्यूच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्ये ३ विकेट घेणारा प्रफुल हिंगे पहिला गोलंदाज बनला आहे. त्यात सर्वात खास विकेट त्याने वैभव सूर्यवंशीला आउट करणे होते. त्याच्या सामन्यातील पहिलाच चेंडू होता. हिंगेने त्याला अचूक बाउन्सर टाकून धक्का दिला. परंतु वैभव सूर्यवंशीला माघारी पाठवणाऱ्या प्रफुल हिंगे आणि हार्दिक पांड्या यांच्यात काय झालं होते तुम्हाला माहिती आहे का?

3 / 10

प्रफुल हिंगे आणि हार्दिक पांड्या यांच्यातील घटना आता चर्चेत आली आहे. वैभव सूर्यवंशीला बाद करण्याच्या १०० दिवसाआधीच असेच काही घडले होते. तेव्हा विजय हजारे ट्रॉफीचे सामने खेळले जात होते. ३ जानेवारी २०२६ रोजी विदर्भ आणि बडोदा यांच्यात सामना होता.

4 / 10

हार्दिक पांड्या या मॅचमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत होता. या सामन्यात विदर्भाचा कॅप्टन हर्ष दुबे याने प्रफुल हिंगेच्या हातात चेंडू सोपवला. आता हार्दिक, ज्याच्या फॉर्मसमोर मोठमोठे आंतरराष्ट्रीय गोलंदाजही दहशतीत असतात. त्याच्या समोर नवख्या प्रफुलला गोलंदाजी करायची होती

5 / 10

त्या सामन्यात प्रफुल हिंगे आणि त्याची टीम विजयाच्या प्रतिक्षेत होती. प्रफुल हिंगे याने स्वतःवर नियंत्रण ठेवून हार्दिक पांड्याला आपल्या गोलंदाजीची ओळख करून दिली. त्याने हार्दिकसमोर यॉर्कर आणि बाउन्सर टाकले. त्याच्या गोलंदाजीने हार्दिकही प्रभावित झाला आणि त्याने प्रफुलला सांगितले, 'आयपीएलमध्ये भेटू'

6 / 10

प्रफुल हिंगेने विजय हजारे ट्रॉफीतील त्या सामन्यात १० षटकांत ४७ धावा देत १ विकेट घेतली होती. प्रफुल हिंगेची ती एक विकेट हार्दिक पांड्याची नसली तरी प्रफुलच्या विदर्भ टीमने २९४ धावांचा पाठलाग करून हा सामना जिंकण्यात यश मिळवले.

7 / 10

प्रफुल हिंगेच्या आयपीएल २०२६ ची सुरुवात जबरदस्त झाली आहे. त्याच्या डेब्यू सामन्यातच त्याने सगळ्यांना थक्क केले. आता सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पाहणे रंजक ठरेल. या सामन्यात पुन्हा प्रफुल आणि हार्दिक समोरासमोर येतील. २९ एप्रिलला हा सामना मुंबईतील वानखेडेवर खेळला जाईल.

8 / 10

ज्या वैभव सूर्यवशीनं यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराह, जोश हेडलवूड आणि भुवनेश्वर कुरमारची धुलाई केली त्याला प्रफुल हिंगे याने आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केले. चौथ्या चेंडूवर त्याने कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या ध्रुव जुरेलला खातेही न उघडता माघारी धाडले.

9 / 10

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात प्रफुल याला IPL पदार्पणाची संधी मिळाली. ईशान किशन याने यावेळी डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. या पठ्ठ्यानं पहिल्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल याला एक धाव दिली. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट घेत IPL मध्ये पहिल्या विकेटचं खाते उघडले.

10 / 10

यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी हा सर्वात लक्षवेधी आणि चर्चित चेहरा राहिला आहे. या सामन्यातही पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. पण पहिल्याच षटकात प्रफुल पटेल IPL च्या नव्या हिरोच्या रुपात चर्चेत आला आहे.

टॅग्स :आयपीएल २०२६सनरायझर्स हैदराबादहार्दिक पांड्याविजय हजारे करंडक