Mutual Fund Investment: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ हे अत्यंत उत्साहाचं ठरलंय. 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'च्या (AMFI) ताज्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड्सचा एकूण एसेट बेस (AUM) १२.२ टक्क्यांनी वाढून ७३.७३ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला.
इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये मोठी गुंतवणूक
जागतिक स्तरावर अस्थिरता असूनही, ॲक्टिव्ह इक्विटी म्युच्युअल फंड्समधील इनफ्लो वाढून ४०,४५०.२६ कोटी रुपये झाला आहे. जुलै २०२५ नंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. फेब्रुवारीमध्ये हा आकडा २५,९७७.८१ कोटी रुपये इतका होता.
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
एसआयपी (SIP) गुंतवणूकीचा नवा उच्चांक
मार्च महिन्यात एसआयपी (SIP) इनफ्लो ३२,०८७ कोटी रुपये राहिला, जो मागील महिन्यात २९,८४५ कोटी रुपये होता. किरकोळ गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेमध्येही दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असल्याचं यातून दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, पोर्टफोलिओ वाटप आणि पश्चिम आशियातील तणावामुळे बाजार घसरल्यानं कमी मूल्यांकनावर गुंतवणूक वाढल्यामुळे ही तेजी पाहायला मिळाली आहे.
डेट फंड आणि गोल्ड ईटीएफमधील स्थिती
मार्च महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगात २.३९ लाख कोटी रुपयांचा 'नेट आउटफ्लो' दिसून आला, तर फेब्रुवारीमध्ये ९४,५३० कोटी रुपयांचा 'नेट इनफ्लो' होता. मार्चमध्ये डेट म्युच्युअल फंडातून २.९४ लाख कोटी रुपये बाहेर पडले. तसंच, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूकही घटून २,२६६ कोटी रुपयांवर आली आहे, जी फेब्रुवारीमध्ये ५,२५४.९५ कोटी रुपये होती.
फ्लेक्सी-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडला पसंती
इक्विटी श्रेणीमध्ये मार्च महिन्यात फ्लेक्सी-कॅप फंडांमध्ये सर्वाधिक १०,०५४.१२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप फंडांमध्ये अनुक्रमे ६,२६३.५६ कोटी आणि ६,०६३.५३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्याचबरोबर लार्ज-कॅप फंडांमध्ये २,९९७.८४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचं एक साधन आहे, जिथे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून एक फंड तयार केला जातो. हा पैसा प्रोफेशनल फंड मॅनेजर शेअर बाजार, सरकारी बाँड्स किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतवतात. गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागली गेल्यामुळे जोखीम कमी होते. तुम्ही SIP च्या माध्यमातून १०० किंवा ५०० रुपयांसारख्या छोट्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. ज्यांना शेअर बाजाराचे थेट ज्ञान नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian mutual funds see record growth, AUM exceeding ₹73.73 lakh crore. Equity funds surge, SIP inflows hit ₹32,087 crore. Despite debt outflows, flexi-cap funds are favored. Mutual funds offer diversified investment, reducing risk for investors.
Web Summary : भारतीय म्यूचुअल फंड में रिकॉर्ड वृद्धि, एयूएम ₹73.73 लाख करोड़ से अधिक। इक्विटी फंड में उछाल, एसआईपी प्रवाह ₹32,087 करोड़। ऋण बहिर्वाह के बावजूद, फ्लेक्सी-कैप फंड पसंदीदा। म्यूचुअल फंड विविधीकृत निवेश प्रदान करते हैं, निवेशकों के लिए जोखिम कम करते हैं।