शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:36 IST

५ वर्षांपूर्वी जो भाऊ कायमचा दुरावला होता, तो अचानक  वैष्णोदेवी मंदिर परिसरात सापडला.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये कोणतीही फिल्मी स्टोरी नाही, तर सख्ख्या भाऊ-बहिणीच्या भेटीची हृदयस्पर्शी गोष्ट आहे, जी पाहून कठोर मनाचा माणूसही गहिवरून जाईल. ५ वर्षांपूर्वी जो भाऊ कायमचा दुरावला होता, तो अचानक  वैष्णोदेवी मंदिर परिसरात सापडला.

५ वर्षांपूर्वी कुटुंबातील मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केलं, पोलीस स्टेशनच्या चकरा मारल्या, गल्ली न् गल्ली शोधून काढली, पण त्या मुलाचा कुठेही शोध लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि तो आता कधीच परत येणार नाही, असं लोकांना वाटू लागले. पण म्हणतात ना, बहिणीच्या प्रेमात आणि प्रार्थनेत खूप ताकद असते. बहीण दररोज देवीकडे एकच मागणं मागायची. "माझा भाऊ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि एकदा तरी त्याची भेट होऊ दे" असं म्हणत होती. 

जेव्हा बहीण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूला पोहोचली होती. भक्तांची अलोट गर्दी, जयघोषाचा आवाज याचं दरम्यान ती मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होती. तितक्यात 'अर्धकुंवारी'जवळ तिची नजर एका तरुणावर पडली. तो तरुण अत्यंत दयनीय अवस्थेत, फाटलेल्या कपड्यांमध्ये एका भिकाऱ्यासारखा कडेला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर धूळ आणि काळाचे घाव स्पष्ट दिसत होते. जशी बहिणीची नजर त्या चेहऱ्यावर स्थिरावली, तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा ती जवळ गेली आणि तिने नीट पाहिलं, तेव्हा तिचा थरकाप उडाला... हा तिचा तोच धाकटा भाऊ होता, जो ५ वर्षांपूर्वी हरवला होता.

आपल्या हताश भावाला ओळखताच बहीण हंबरडा फोडून रडू लागली. भावानेही जेव्हा आपल्या बहिणीला पाहिलं, तेव्हा त्याच्याही डोळ्यांतून अश्रू आले. दोघे एकमेकांना मिठी मारून असे रडले की, आसपास उभ्या असलेल्या भाविकांचेही डोळे पाणावले. लोक अवाक झाले होते. आता लोक हा व्हिडीओ शेअर करून लिहित आहेत की, "श्रद्धा खरी होती, साक्षात मातेने 'चमत्कार'च घडवून आणला आहे." हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sister finds lost brother begging at Vaishnodevi after five years.

Web Summary : A sister visiting Vaishno Devi found her brother, missing for five years, begging. Her prayers were answered in a miraculous reunion at the temple, moving onlookers.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया