Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:48 IST

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने कमाल करून दाखवली आहे. अवघ्या एका वर्षात ८० लाख रुपयांचं 'स्टुडंट लोन' फेडून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

कर्जाचं नाव काढताच अनेकांना घाम फुटतो मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने कमाल करून दाखवली आहे. अवघ्या एका वर्षात ८० लाख रुपयांचं 'स्टुडंट लोन' फेडून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिला कोणतीही लॉटरी लागली नाही किंवा कोणतीही जादू झाली नाही... तिच्याकडे होती ती फक्त तिची जिद्द आणि सेव्हिंगचा असा आदर्श, ज्याचं आज सर्वजण भरभरून कौतुक करत आहेत.

शिक्षणासाठी परदेशात जाणं आणि तिथे मोठं कर्ज घेणं ही आजकालची पद्धतच झाली आहे, परंतु ते कर्ज डोईजड होण्यापूर्वी संपवणं प्रत्येकालाच जमत नाही. या भारतीय तरुणीने मनाशी पक्कं ठरवलं होतं की, आपल्या डिग्रीचं ओझं ती आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या खांद्यावर पडू देणार नाही. तिने निश्चय केला की, काहीही झालं तरी एक लाख डॉलर्सचं कर्ज ती स्वतःच फेडेल. यानंतर तरुणीने जे काही करून दाखवलं आहे ते एखाद्या चित्रपटातील कथेपेक्षा कमी नाही.

बाहेरचे खाणं बंद आणि 'डबल ड्युटी'

हे यश मिळवण्यासाठी तिने आपल्या ऐशोआरामाच्या आयुष्याला जणू बाजुला सारलं. बाहेर जाऊन पिझ्झा-बर्गर खाणं तर दूरच, तिने शॉपिंग आणि फिरण्यावरही कडक निर्बंध लावले. आपल्या मुख्य नोकरीसोबतच ती दिवसरात्र अतिरिक्त कामामध्ये गुंतलेली असायची. तिच्या डोळ्यासमोर फक्त ते कर्जाचं अकाऊंट होतं, जे तिला पूर्णपणे करायचंच होतं. पै-पै साठवून तिने जे शिस्तबद्ध आयुष्य जगलं, तो आजच्या खर्चिक पिढीसाठी एक मोठा धडा आहे.

शांत झोपेसाठी सुखाचा त्याग

तरुणीचं असं म्हणणं आहे की, डोक्यावर कर्जाची टांगती तलवार असेल तर शांत झोप येत नाही. तिला तिच्या सुखसोयींपेक्षा मानसिक शांतता आणि कुटुंबाचा सन्मान अधिक प्रिय होता. तिने प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला, बजेट बनवलं आणि त्याचं तंतोतंत पालन केलं. तिची ही प्रेरणादायी गोष्ट आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. लोक म्हणत आहेत की, जर दृढ निश्चय असेल तर केवळ एक वर्षात नशीबही बदलता येतं.

टॅग्स :विद्यार्थीपैसाअमेरिकाभारतसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओप्रेरणादायक गोष्टी