Goregaon Nesco Centre Drugs Case: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत.
पहाटे ५:३० वाजता थरार; दरवाजा तोडण्याची तयारी अन्...
मुंबईतील वनराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ड्रग्ज पुरवणारा आनंद पटेल याचे लोकेशन कल्याणमध्ये सापडले. कल्याण खडकपाडा पोलिसांनी तातडीने वायले नगरमधील मोहन हाईट्स इमारतीत सापळा रचला. पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी आनंदच्या घरावर धाड टाकली. सुरुवातीला त्याने दरवाजा उघडण्यास नकार दिला, मात्र जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी केली, तेव्हा घाबरलेल्या आनंदने दार उघडले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केले.
नेमका प्रकार काय?
गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आयोजित कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचा उघड वापर करण्यात आला होता. प्राथमिक तपासानुसार, या पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी नशेत होते. म्युझिकच्या तालावर डान्स करत असताना दोन विद्यार्थ्यांची प्रकृती ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे बिघडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कोणाचे काय कनेक्शन?
अटकेत असलेले आनंद पटेल आणि प्रतीक पांडे हे मित्र आहेत. प्रतीकने गोरेगावच्या पार्टीसाठी आनंदकडून ड्रग्ज खरेदी केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, आनंद पटेल आणि त्याच्या वडिलांवर मिळून तब्बल १९ गुन्हे आधीच दाखल आहेत. आनंदने चौकशीत कबुली दिल की, त्याने हे ड्रग्ज आशिष नावाच्या व्यक्तीकडून घेतले होते. आता पोलीस या आशिषचा शोध घेत आहेत.
प्रशासकीय यंत्रणांचा भोंगळ कारभार?
या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. हाय-प्रोफाईल नेस्को संकुलात ड्रग्ज पोहोचलेच कसे तसेच हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती का? ड्रग्जचा वापर होत असताना सुरक्षा रक्षक काय करत होते? असे प्रश्न आता विचारले जात आहे.
Web Summary : After two student deaths at a Nesco Centre concert due to drug overdose, police arrested the supplier in Kalyan. He confessed to obtaining drugs from another person, now being sought. The event raises questions about security lapses.
Web Summary : नेस्को सेंटर में ड्रग्स के ओवरडोज से दो छात्रों की मौत के बाद, पुलिस ने कल्याण में सप्लायर को गिरफ्तार किया। उसने कबूल किया कि उसने ड्रग्स किसी और से लिए थे, जिसकी तलाश जारी है। घटना सुरक्षा चूक पर सवाल उठाती है।