America Iran War: पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात २१ तास प्रदीर्घ चर्चा होऊनही बैठक कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. अखेर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. पी. व्हान्स मायदेशात परत निघून गेले. सदर बैठक कोणत्याही परिणामापर्यंत न पोहोचल्याबाबत दोन्ही देशांनी एकमेकांकडे बोट दाखवत टीका केली होती. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका दाव्याला इराणने मुंबईतून प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने करारासंदर्भात पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे. त्यांनी अमेरिकेला तसा संदेशही पाठवला आहे. तर, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही इस्लामाबाद चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात बोलतान ट्रम्प म्हणाले की, सध्या अमेरिकेने इराणवर कडक नाकेबंदी लागू केली असून त्यांचा कोणताही व्यापार सुरू नाही. इराणकडे कुठल्याही प्रकारची अण्वस्त्रे नसतील. यासाठी ते सहमत नसतील, तर कुठल्याही प्रकारचा करार होणार नाही. आम्ही, कुठल्याही देशाला, जगाला ब्लॅकमेल करण्याची परवानगी देऊ शकत नाही. ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अंतर्गत तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सीझफायरची मुदत संपण्यापूर्वी ही बैठक पार पडू शकते.
अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…
मुंबईतील इराणी वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार असा दावा करत आहेत की, इराणचे नौदल संपले आहे, परंतु अतिवेगवान क्षेपणास्त्र नौका विकसित केल्या जात आहेत. होर्मुझ - पर्शियन आखातात वेगवान क्षेपणास्त्र नौका बांधल्या जात आहेत. ही एक रंजक गोष्ट आहे की, ट्रम्प यांनी सातत्याने दावा केला आहे की इराणचे नौदल 'संपले' आहे. आता त्यांना कळेल की एक मोठा ताफा तुम्हाला किती वेगाने वेढू शकतो. हा तर फक्त ट्रेलर आहे, खरे चित्र अजून बाकी आहे, अशी पोस्ट एक्सवर करण्यात आली आहे.
दरम्यान, इस्लामाबादमधील चर्चेदरम्यान, अमेरिकेने इराणला २० वर्षांसाठी युरेनियम संवर्धन थांबवावे आणि देशातून आपला उच्च संवर्धित साठा हटवण्याची अट घातली होती. मात्र, इराणने कमी कालावधीत आणि नियंत्रित पद्धतीने कपात करण्याचा प्रस्ताव दिला होता. या मुद्द्यावरील मतभेदांमुळे करार होऊ शकला नाही. मात्र, आता इराण अणुसंवर्धनावर काही तडजोड करण्यास सहमत झाला असल्याचे समोर येत आहे.
Web Summary : Despite stalled US-Iran talks, Trump claims Iran seeks a deal. Iran, responding from Mumbai, dismisses Trump's claim that its navy is 'finished,' showcasing missile boat development, calling it just a 'trailer'.
Web Summary : अमेरिका-ईरान वार्ता विफल होने के बावजूद, ट्रम्प का दावा है कि ईरान समझौता चाहता है। मुंबई से जवाब देते हुए, ईरान ने ट्रम्प के नौसेना को 'समाप्त' बताने के दावे को खारिज किया, मिसाइल नाव विकास को 'ट्रेलर' बताया।