शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 6:31 PM

भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत.

ठळक मुद्दे भारतात कोरोना व्हायरस लशींच्या शर्यतीत सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वात पुढे आहे.काही वृत्तांत म्हणण्यात आले होते, की SII ची लस COVISHIELD 73 दिवसांच्या आत बाजारात उपलब्ध होईल.कंपनीचे म्हणणे आहे, की हा केवळ एक अंदाज आहे. ही लस परीक्षण यशस्वी झाल्यानंतर आणि रेग्यूलेटरी अप्रूव्हल मिळाल्यानंतरच  बाजारात येईल. 

मुंबई/नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस लशींच्या शर्यतीत सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वात पुढे आहे. सीरम ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेल्या लशीचे परीक्षण आणि उत्पादन करणार आहे. या कंपनीला सरकारने लशीच्या उत्पादनाची मंजुरी दिली आहे. काही वृत्तांत म्हणण्यात आले होते, की SII ची लस COVISHIELD 73 दिवसांच्या आत बाजारात उपलब्ध होईल. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे, की हा केवळ एक अंदाज आहे. ही लस परीक्षण यशस्वी झाल्यानंतर आणि रेग्यूलेटरी अप्रूव्हल मिळाल्यानंतरच  बाजारात येईल. 

स्वतःच सांगू, केव्हा येणार लस -सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या एका निवेदवात म्हटले आहे, की "सरकारने सध्या आम्हाला केवळ भविष्‍यात वापरासाठी लशीचे उत्पादन आणि साठवण करण्याची परवानगी दिली आहे." कंपनीने स्पष्ट केले आहे, की जेव्हा परीक्षण यशस्वी होईल आणि रेग्युलेटरी अप्रूव्हल मिळेल तेव्हाच COVISHIELD बाजारात येईल. ऑक्‍सफर्ड-अस्ट्राजेनेकाच्या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू आहे. एकदा ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास ते स्वतःच तिच्या उपलब्धतेसंदर्भात सांगतील. कंपनीची लस निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांतील देशांत केवळ 3 डॉलर, म्हणजेच साधारणपणे 225 रुपयांना उपलब्ध होईल.

भारतात 17 ठिकाणी सुरू आहे ट्रायल - 'नेचर' जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, माकडांवर ही लस पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. माकडांत कोविड-19 विरोधात इम्‍यूनिटी डेव्हलप झाली आहे. मानवावरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण झाले आहे. भारत, ब्राझील सह जगातील अनेक देशांत तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे. भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत. नोव्हेंबरपर्यंत हे परिक्षण पूर्ण होण्याची आशा आहे. याचा निकाल चांगला आला, तर रेग्युलेटरी अप्रूव्हलनंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून लशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायरला सुरूवात होऊ शकते.

ऑक्‍सफर्ड लशीची बुकींग -जगभरातील देशांचा ऑक्सफर्डची लस विकत घेण्याकडे ओढा आहे. यूनायटेड किंगडमने 100 मिलियन डोसची डील केली आहे. ब्राझील सरकारनेही 127 मिलियन डॉलरमध्ये 30 मिलियन डोसचा सौदा केला आहे. याशिवाय यूरोपियन यूनियनमधील अनेक देश सध्या सौदा करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ऑक्‍सफर्डने म्हटले आहे, की यूकेमध्ये ही लस स्वस्तात उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या -

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

अमेरिकेच्या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान, ट्रम्प यांच्या प्रचार व्हिडिओत मोदींचा समावेश

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंMedicalवैद्यकीयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस