CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:25 AM2020-08-15T00:25:55+5:302020-08-15T00:52:35+5:30

रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे. यानंतर, आता जगातील इतर देशांनाही कोरोनालस तयार करण्यात मदत करण्याची त्याची इच्छा आहे. रशियन अधिकाऱ्यांनी CNN सोबत बोलताना सांगितले, की त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीसंदर्भात अमेरिकेच्या ऑपरेशन वार्प स्पीडला सहकार्य करण्यासाठीही हात पुढे केला आहे. अमेरिकेने ऑपरेशन वार्प स्पीड एजन्सी, कोरोनावरील उपचार आणि परिणामकारक लस लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केली आहे.

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की अमेरिकेने रशियाकडून कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला आहे. रशियाच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएनशी बोलताना सांगितले, की 'रशियाच्या बाबतीत अमेरिका नेहमीच साशंक असतो. यामुळे मला वाटते, की लस, टेस्टिंग आणि उपचारांसारख्या बाबतीतही आमची मदत न घेणे हा त्याच अविश्वासाचा परिणाम आहे.'

व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कायले मॅकनी यांनी म्हटले आहे, की राष्ट्रपती ट्रम्प यांना रशियाच्या लसीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मॅकनी यांनी म्हटले आहे, की अमेरिकन लसीला तिसऱ्या टप्प्यातील कठील परीक्षण आणि उच्च मानकांतून जावे लागते.

एका दुसऱ्या अमेरिकन अधिकाऱ्याने सीएनएनशी बोलताना सांगितले, की अमेरिकेने रशियाच्या अर्धवट लसीला कधीच गांभीर्याने घेतले नाही. अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे, की 'रशियाने जशी लस तयार केली आहे, तशा लसीचा वापर आम्ही माकडांवर करतो.'

रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की ते आपल्या लसीसंदर्भातील माहिती जाहीर करायला तयार आहेत. याच्या सहाय्याने अमेरिकन औषध कंपन्या आपल्या देशातही रशियाची लस तयार करू शकतात.

रशियाने यापूर्वीच सांगितले आहे, की अमेरिकेच्या काही कंपन्यांनी रशिनय लसीसंदर्भात जाणून घेण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र त्यांनी या कंपन्यांची नावे सांगितली नाहीत.

रशियाचे म्हणणे आहे, की अमेरिकेने आमच्या लसीवर गांभीर्याने विचार करायला हवा. Sputnik V लस अनेक अमेरिकन नागरीकांचा जीव वाचवू शकते. रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की 'आमची लस सर्वात प्रभावी ठरली, तर अमेरिकेवर प्रश्न उपस्थित होतील, की त्यांनी यावर सखोल विचार का केला नाही. लसीवर राजकारण का केले गेले?'

अमेरिकन सरकारचे एक सल्लागार आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले, की अमेरिकेने रशियाच्या कोरोना लसीचे कुठलेही सॅम्पल मागितलेले नाही. या लसीवर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, रशियात सध्या एवढे कोरोनाबाधित आहे, की ते सहजपणे आपल्या कोरोना लसीचे परीक्षण करू शकत होते. मात्र, त्यांनी लसीचे परीक्षण मोठ्या प्रमाणावर केले नाही.

अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले आहे, की 'लसीचे कसल्याही प्रकारचे परीक्षण केले गेलेले नाही. या लसीवर त्यांनी म्हणावे तसे काम केलेले नाही. मानवी परीक्षणही फार कमी लोकांवर करण्यात आले आहे. त्यामुळे ही लस मोठ्या जनसमूहावर कितपत प्रभावी ठरेल हे स्पष्ट होत नाही. हा डेटा पूर्णपणे असुरक्षित आणि अपुरा आहे.'

अमेरिकेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रशियन लस मजाक असल्याचे म्हणत, रशियाने तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण केलेले नाही, त्यामुळे ना जागतीक आरोग्य संघटना तीची गांभीर्याने दखल घेत आहे, ना अमेरिका तीच्याकडे गांभीर्याने पाहात आहे. रशियन लसीच्या तुलनेत अमेरिकन अधिकाऱ्यांनी चीनी लसीवर अधिक विश्वास आहे.

अमेरिकन सरकारच्या सल्लागाराने म्हटले आहे, की 'लसीच्या शर्यतीत चीन विजयाच्या अधिक जवळ आहे. लसीच्या परीक्षणाबाबतीत चीन अधिक गंभीर आहे आणि तो पूर्ण गांभीर्याने आपली भूमिका पार पाडत आहे.'

अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की सध्य स्थितीचा फायदा घेण्यासाठी रशियाने घाई गडबडीत ही लस लॉन्च केली आहे. कोरोना व्हायरसमुळे पुतिन यांच्यावर जनतेचा प्रचंड दबाव होता. एका माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे, की 'लसीसंदर्भात तेथे कुणीही पुतिन यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत करू शकत नाही.'