शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 17:32 IST

निधनापूर्वी त्यांनी काही लोकांशी फोनवरही चर्चा केली आणि कोरोनाला खबरदारी घेण्यास सांगितले.

ठळक मुद्देडॉ. अमित यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, अमित यांचा कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते योग्य  विश्रांती घेऊ शकले नाहीत.

अल्वर : "मी डॉक्टर आहे. ना देव किंवा योद्धा. जेव्हा मी आयसीयूमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मला असे वाटते की रणांगणापेक्षा काही कमी नाही. आम्हाला या व्हायरस बॉम्बपासून आपल्याला आणि देशाला वाचवायचे आहे", असे सांगणारा एक व्हिडिओ डॉ. अमित दायमा यांनी डॉक्टर आणि सर्व फ्रंटलाइन वर्कर्सच्या सन्मानार्थ  त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मात्र, तीन दिवसांनी दिल्लीतील रूग्णालयात कर्तव्य बजावताना डॉ. अमित दायमा यांचा मृत्यू झाला. व्हिडीओमध्ये डॉ. अमित हे सर्व डॉक्टरांचा आवाज बनले असून म्हणतात की, आमच्या विडंबनाची जाणीव करुन पाहा, मी सुद्धा मरत आहे, परंतु मला शहीदचा दर्जा मिळत नाही, देशाने आमच्यासाठी थाळी आणि घंटा वाजवली, मी त्यातही आनंदी असल्याचे जाणवते. (corona warrior dr amit dayma death, motivational video viral)

डॉ. अमित यांच्या निधनानंतर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्यांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत आहेत. डॉ. अमित हे बन्सूरचे तीन वेळा आमदार होते आणि ते माजी मंत्री जगतसिंग दायमा यांचे पुत्र होते. गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने ४० वर्षीय अमित यांचे निधन झाले. डॉ. अमित व्हिडीओमध्ये सांगत आहेत की, 'मलाही एक आई, एक मुलगा, एक कुटुंब आहे. प्रेमापोटी आई ही नोकरी सोडायला सांगते. पण माझे कर्तव्य मला ते करू देत नाही. मी कोरोना रूग्णांची सेवा देण्यासाठी आयसीयूमध्ये जातो तेव्हा माझे कुटुंब देखील घाबरते. पण आम्ही डॉक्टर कर्तव्यापासून माघार घेत नाही.'

(CoronaVirus : टास्क फोर्स राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधणार, मुख्यमंत्रीही मार्गदर्शन करणार!)

मानवतेच्या बाबतीत भारत सर्वोत्कृष्ट या जागतिक साथीने काळाबाजार आणि लोकांना लुटण्याचे एक प्रकारे साधन बनवले आहे. या महामारीला माणुसकीचे उदाहरण बनवण्यासाठी त्यांनी हात जोडून विनंती केली आहे. संपूर्ण जगाने हे पहावे की मानवता, संस्कृती आणि संस्कारामध्ये भारत सर्वोत्कृष्ट आहे, असे डॉ. अमित यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ते म्हणाले की आपली परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. या कोरोना संकट काळात आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत नाही आहेत. आपले कुटुंब सोडून आपले कर्तव्य बजावत आपण देशाला वाचवायचे आहे. आम्हाला थोडे प्रेम, सहानुभूती आणि आदर हवा आहे. डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, रुग्णवाहिका कामगार याशिवाय आणखी काही नको आहे. कारण तुम्ही सर्व माझी हिम्मत आहात.

कोरोनाची लागण झाल्यानंतरही आरोग्य सेवा करत होतेडॉ. अमित यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, अमित यांचा कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते योग्य  विश्रांती घेऊ शकले नाहीत. दरम्यान, ते कोरोनापासून देखील बरे झाला होते. त्यानंतर लगेचच त्यांनी रुग्णांची सेवा सुरू केली. निधनापूर्वी त्यांनी काही लोकांशी फोनवरही चर्चा केली आणि कोरोनाला खबरदारी घेण्यास सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसRajasthanराजस्थान