शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

Corona oxygen : Oxygen अभावी झालेल्या मृत्यूंबाबत मंत्र्याचं उत्तर, नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 2:31 PM

शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे.

ठळक मुद्देशिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरादखलच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही' असे लिखीत उत्तर पवार यांनी संसदेत केलं आहे. त्यावरुन विरोधी पक्षांसह नेटीझन्सनेही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या उत्तरानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार युपीमध्ये ऑक्सिजनची कमतरता नव्हती, योगी आदित्यनाथ यांनी परिस्थिती चांगली हाताळली. मग, युपीतील लोकांना मरण्याचा शौक होता का, स्वत: मेले?. आठवतंय का, प्रयागराज उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा झालेला मृत्यू हा गुन्हा असल्याचं म्हटलं होतं. नरसंहारपेक्षा कमी नाही. फक्त तुम्हीच खरे, बाकी खोटे.... असे ट्विट सिंह यांनी केलं आहे. संजय राऊतही केंद्रावर भडकले

एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतदरम्यान संजय राउत म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा,"अशी मागणी राऊतांनी केली.    

काय म्हणाल्या डॉ. भारती पवार ?काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, "आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत सरकारला आंधळं आणि असंवेदनशील म्हटल आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूHealthआरोग्य