शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर वाद चिघळला

By admin | Updated: December 22, 2014 04:18 IST

धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे.

नवी दिल्ली : धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे. धर्मांतराबाबतच्या वादग्रस्त विधानांनी मोदी सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच विहिंप नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद चिघळू लागला आहे. गुजरातमधील आदिवासींच्या घर वापसीचा कार्यक्रम आणि दिल्लीत अशोक सिंघल यांनी केलेली विधाने यामुळे या वादाची धग आणखी वाढली. परिणामी राज्यसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये झालेली कोंडी फुटणे अवघड बनले आहे. आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे, तर लोकांची मने जिंकायला निघालो आहोत, अशी भूमिका घेत जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लीमच कारणीभूत असतात, असे वादग्रस्त विधान विहिंप नेते अशोक सिंघल यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. मुस्लीम, ख्रिश्चन हे युद्धातील खेळाडू आहेत, असे सांगत त्यांनी ‘घर वापसी’चे समर्थन केले. > पदत्यागाची चर्चा तथ्यहीनधर्मांतराच्या मुद्द्यावर संघ परिवारातील नेते करीत असलेल्या वक्त व्यांमुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची भाषा केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. > राज्यसभेतील कोंडी कायम राहणार ?>  कोलकात्यात सरसंघचालकांनी केलेले हिंदू राष्ट्राविषयीचे सूचक भाष्य आणि सिंघल यांनी केंद्रात हिंदू सरकार आल्याचे केलेले वक्तव्य या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील कोंडी कायम राहील, अशी चिन्हे आहेत. > विरोधकांचा पारा आणखी वाढेल, अशा वादग्रस्त विधानांच्या जोडीला विश्व हिंदू परिषदेने ‘घर वापसी’ची मोहीम सुरूच ठेवली आहे. रविवारी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अरनाई येथे ख्रिश्चन समाजातील सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले. > बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही, असा दावाही विहिंपने केला आहे. हे सर्व जण आधी हिंदूच होते, मात्र नंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. > विहिंपच्या या कार्यक्र माबाबत वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मांतराचा कार्यक्र म आयोजित करण्यापूर्वी विहिंपने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, हे स्पष्ट झालेले नाही.