शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक न्यायालयातील गर्दी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ मुळे घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 04:55 IST

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कारवाई करण्यासाठी मंगळवारी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ सुरू केले.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कारवाई करण्यासाठी मंगळवारी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ सुरू केले. त्यात अर्थ, बँकिंग, विमानसेवा विभाग, ई-कॉमर्स कंपन्यांसह देशातील जवळपास ४२ विभागांचे प्रश्न सोडवण्याचे लक्ष्य ठरवले गेले आहे.केंद्रीय ग्राहक कामकाज, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ गूगल प्ले स्टोरवरून मोबाईलवर अपलोड करून लोक आपली तक्रार दाखल करू शकतात. ते म्हणाले, अ‍ॅपवर दाखल झालेल्या तक्रारींची रोज मॉनिटरिंग होईल आणि आठवड्यात एकदा स्वत: अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींवर झालेल्या कारवायांचा आढावा घेतील. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीवर १५ ते २० दिवसांत कारवाई होईल. याशिवाय ज्या तक्रारींमध्ये जास्त पत्रव्यवहार व वेळ लागणार आहे त्यांच्या निराकरणासाठी जास्तीतजास्त ६० दिवसांची मुदत ठरवली गेली आहे. यानंतरही तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जाईल. ग्राहकाला त्याचे अधिकार व विभागीय कारवाईची माहिती दिली जाईल असे हे पहिलेच अ‍ॅप आहे, असे पासवान यांनी सांगितले.केंद्रीय ग्राहक कामकाज मंत्रालयातील सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, दरवर्षी जवळपास १.७५ लाख ग्राहक आपल्या तक्रारी दाखल करतात. देशाच्या ग्राहक न्यायालयात ४४ लाखांतील ४० लाख तक्रारी विचाराधीन आहेत. ग्राहक न्यायालयांच्या स्थापनेनंतर आतापर्यंत एकूण चार लाख तक्रारींवर निर्णय झालेला आहे. अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे निराकरण ताबडतोब व्हावे म्हणजे ग्राहक न्यायालयात कमी प्रकरणे जातील.

टॅग्स :consumerग्राहकCourtन्यायालय